Join us  

Happy New Year 2019 : या सुपरहिट पार्टी सॉन्गने करा नववर्षाचे स्वागत...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 9:20 PM

नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्यांसाठी आम्ही काही धमाकेदार पार्टी सॉन्ग घेऊन आलो आहोत. या गाण्यांशिवाय कदाचित तुमचे न्यू ईअर सेलिब्रेशन अधुरे ठरावे...

ठळक मुद्देपार्टी सॉन्गच्या प्ले लिस्टमध्ये टॉप 1 वर आहे, अलीकडे रिलीज झालेल्या रणवीर सिंग व सारा अली खानच्या ‘सिम्बा’ या चित्रपटाचे ‘आंख मारे’ हे गाणे.  या गाण्याला   biggest party anthem चा टॅगही मिळाला आहे.

नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी पूर्ण झालीय आणि न्यू ईअर सेलिब्रेशन म्हटले की, पार्टी सॉन्ग आलेच. धमाकेदार, सुपरहिट पार्टी सॉन्ग पार्टीचा, सेलिब्रेशनचा मूड बनवतात आणि पावलं आपोआप थिरकू लागतात. या नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्यांसाठी आम्ही काही धमाकेदार पार्टी सॉन्ग घेऊन आलो आहोत. या गाण्यांशिवाय कदाचित तुमचे न्यू ईअर सेलिब्रेशन अधुरे ठरावे...

पार्टी सॉन्गच्या प्ले लिस्टमध्ये टॉप 1 वर आहे, अलीकडे रिलीज झालेल्या रणवीर सिंग व सारा अली खानच्या ‘सिम्बा’ या चित्रपटाचे ‘आंख मारे’ हे गाणे.  या गाण्याला   biggest party anthem चा टॅगही मिळाला आहे. खरे तर ‘सिम्बा’चे हे गाणे अर्शद वारसीवर चित्रीत गाण्याचा रिमेक आहे. पण तरिही लोकांनी ते डोक्यावर घेतले. आजच्या न्यू ईअर पार्टीत हे गाणे हमखास वाजायला हवेच...

पार्टी सॉन्गच्या प्ले लिस्टमध्ये टॉप2वर आहे, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाचे ‘दिल चोरी साढा हो गया...’ हे गाणे.

‘ब्लॅकमेल’ या चित्रपटातील पटोला गाणे पार्टी सॉन्गच्या प्ले लिस्टमध्ये टॉप3 वर आहे. पंजाबी सिंगर गुरु रंधावाने गायलेले हे गाणे रिक्रिऐट करण्यात आले आहे़. गुरु रंधावानेच ते रिक्रिऐट केले आहे.

‘बद्रीनाथ की दुल्हनियां’ या चित्रपटातील ‘तम्मा तम्मा’ हे गाणे चार्ट बीटवर ऑल टाईम हिट आहे.

कॅटरिना कैफ, सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ‘बार बार देखो’ या चित्रपटातील ‘काला चश्मा’ हे गाणेही पार्टी सॉन्गच्या प्ले लिस्टच्या टॉप चार्टमध्ये आहे.

सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातील ‘स्वॅग से करेंगे सबका स्वागत’ गाणे पार्टी लव्हरमध्ये हिट आहे.

नोरा फतेहीवर चित्रीत ‘दिलबर दिलबर’ हे गाणे टॉप चार्टमध्ये अद्यापही आहे.

‘स्त्री’ या चित्रपटातील ‘कमरिया’ हे गाणेही पार्टीचा मूड बनवणारे आहे.

‘बरेली की बर्फी’मधील ‘स्वीटी तेरा ड्रामा’ हे गाणेही पार्टीत आॅन डिमांड आहे.

टॅग्स :नववर्ष 2019बॉलिवूडसिम्बा