Join us  

Happy Independence Day 2019 : देशभक्तीची भावना जागृत करणारी बॉलिवूडची गाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 9:24 AM

स्वातंत्र्य दिनादिवशी देश भक्तीपर गीते आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात. बॉलिवूड चित्रपटातील अनेक देश भक्तीपर गीते प्रचंड प्रसिद्ध आहेत.

स्वातंत्र्य दिनादिवशी देश भक्तीपर गीते आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात. बॉलिवूड चित्रपटातील अनेक देश भक्तीपर गीते प्रचंड प्रसिद्ध आहेत... जाणून घेऊया कोणती देशभक्तीपर गीते सगळ्यांच्या ओठावर रुळली आहेत.

ए मेरे वतन के लोगोलता मंगेशकर यांनी युद्धानंतर गायलेले ए मेरे वतन के लोगो हे गाणे ऐकताना त्या वेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना देखील आपले अश्रू आवरता आले नव्हते लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी हे एक गाणे आहे.

आय लव्ह माय इंडियापरदेस या चित्रपटातील कविता कृष्णमूर्तीने गायलेले आय लव्ह इंडिया हे गाणे आणि या गाण्याचे बोल मनाला नक्कीच स्पर्शून जातात.

अब तुम्हारे हवाले वतन साथीयोहकीगत या चित्रपटातील अब तुम्हारे हवाले वतन साथीयो हे गाणे देशभक्तीपर गीतांमधील अनेकजणांचे सगळ्यात आवडते गाणे आहे.

चक दे इंडियाचक दे इंडिया या चित्रपटातील चक दे इंडिया हे गाणे ऐकताच एक वेगळा प्रकारचा जोश निर्माण होतो.

ये वतनये वतन हे गाणं राझी चित्रपटातील असून आलिया भटवर चित्रीत करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजारनं केलं असून यात विकी कौशल मुख्य भूमिकेत होता.

तेरी मिट्टीअक्षय कुमारचा चित्रपट केसरीमधील तेरी मिट्टी हे गाणं असून या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगली दाद मिळाली आहे.

टॅग्स :स्वातंत्र्य दिनआलिया भटअक्षय कुमारराझी सिनेमाबाटला हाऊस