Join us  

​हॅपी बर्थ डे तैमूर अली खान! पतौडी पॅलसेमध्ये सेलिब्रेशन सुरु!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 4:52 AM

बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी एकीकडे झी सिने अवार्डमध्ये बिझी असताना करिना कपूर व सैफ अली खान मात्र आपल्या कुटुंबासोबत लाडक्या ...

बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी एकीकडे झी सिने अवार्डमध्ये बिझी असताना करिना कपूर व सैफ अली खान मात्र आपल्या कुटुंबासोबत लाडक्या तैमूरच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये लागले आहेत.   २० डिसेंबर हा छोटा पतौडी नबाव तैमूर अली खान याचा बर्थ डे. आज तैमूर एक वर्षाचा झाला. पतौडी पॅलेसमध्ये तैमूरच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन सुरु झाले आहे.काल रात्री बाराच्या ठोक्याला हे सेलिब्रेशन सुरु झाले. या सेलिब्रेशनचा एक ताजा फोटोही व्हायरल होतो आहे. यात सैफ, करिना आणि करिश्मा कपूर असे सगळे पार्टी मूडमध्ये दिसताहेत. करिना व करिश्मा या दोघी बहिणींचा सेल्फीही सोशल मीडियावर हिट ठरतो आहे.तैमूरच्या वाढदिवसासाठी कपूर आणि खान कुटुंबाचे सगळे सदस्य पतौडी पॅलेसमध्ये पोहोचले आहे. सर्व  जण  एकमेकांसोबत क्वालिट टाईम घालवत आहेत. तैमूर पापा सैफसोबत घोड्यावर बसून सैर करतानाचा फोटो आपण बघितलाच.याशिवाय करिना, सैफ, तैमूर, करिश्मा अशा सगळ्यांचा टॅक्टरची सैर करतानाचा फोटोही व्हायरल झाला आहे. याचा एक व्हिडिओही बघण्यासारखा आहे.,एकंदर काय तर तैमूरचा पहिला वाढदिवस स्पेशल बनवण्यात कुटुंबीयांनी कुठलीही कसर ठेवलेली नाही. अख्खे पतौडी पॅलेस सजले असून तैमूरच्या वाढदिवसासोबतच नाताळचे सेलिब्रेशनही याठिकाणी होणार आहे.तैमूर अली खान कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. सध्या ती आई करिना कपूर आणि पापा सैफ अली खान यांच्यापेक्षाही तैमूर अधिक चर्चेत असतो. तो दिसला रे दिसला की कॅमेरे त्याच्याकडे वळतात. त्याची एक झलक टीपण्यासाठी पापाराझींची झुंबड उडते. इतके कमी की काय म्हणून अलीकडे तैमूरच्या बॉलिवूड कॅमिओच्या अफवाही उडताहेत. पण खरे सांगायचे तर, प्रत्येक पालकांप्रमाणे तैमूरचे मम्मी-पापा यामुळे चिंतीत आहे. इतक्या लहान वयात तैमूरला इतकी प्रसिद्धी मिळतेय, हे पाहून करिना व सैफची चिंता वाढली आहे. या सगळ्या झगमगाटात  स्टारकिड्स म्हणून मोठा होताना तैमूरचे बालपण हिरावले जायला नको, असे करिना व सैफला वाटू लागले आहे. याचमुळे दोघांनीही  तैमूरला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी मध्यंतरी आली होती.