Join us  

बॅकग्राउंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात, एका टीव्ही सीरियलने बदललं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 3:21 PM

बॅकग्राउंड डान्सर ते 'क्योंकी सास भी कभी बहू थी' पासून ब्लॅाकबस्टर चित्रपट 'ब्रह्मास्त्र' प्रर्यंत असा लांबचा पल्ला मौनी रॉयने मेहनतीच्या जोरावर पार केला.

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी खूप संघर्ष करून नाव कमावले. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय. मौनीने फक्त छोट्या पडद्यावरच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. बॅकग्राउंड डान्सर ते 'क्योंकी सास भी कभी बहू थी' पासून ब्लॅाकबस्टर चित्रपट 'ब्रह्मास्त्र' प्रर्यंत असा लांबचा पल्ला तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर पार केलाय. आज मौनी रॉय आपला ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे.

   28 सप्टेंबर 1985 रोजी पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये जन्मलेल्या मौनी रॉयने जामिया मिलिया इस्लामियामध्ये मास कम्युनिकेशनमध्ये प्रवेश घेतला होता. पण, मौनीच्या नशिबी काही वेगळेच होतं. ती मुंबईत आली आणि अभिनयाला सुरवाती केली.  अभिनयाचा वारसा तिला आपल्या घरातूनच मिळाला आहे. मौनीचे आजोबा शेखर चंद्र रॉय आणि आई मुक्ती हे प्रसिद्ध थिएटर कलाकार आहेत.

मौनी पहिल्यांदा अभिषेक बच्चन आणि भूमिका चावला यांच्या 'रन' चित्रपटातील एका गाण्यात बॅकग्राउंड डान्सर म्हणून दिसली होती. यानंतर 2007 मध्ये तिने एकता कपूरच्या 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.  

याशिवाय मौनी रॉय 'देवों के देव महादेव'मध्ये दिसली आहे. तर 'नागिन' मालिकेतली तिची भुमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. इतकंच नाही तर मौनी रॉयने मोठ्या पडद्यावरही आपलं अभिनय कौशल्य दाखवलं.  ब्रह्मास्त्र या चित्रपटात ती रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबत खलनायकाच्या भूमिकेत दिसली होती.

मौनी रॉय टीव्ही शो, चित्रपट, जाहिरात, ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियातून करोडोंची कमाई करते. इतकंच नव्हे तर अभिनेत्री म्युझिक व्हिडिओंमधूनही भरपूर कमाई करते. तर दुबईस्थित व्यापारी सूरज नांबियारसोबत 7 जानेवारी 2022 रोजी तिने लग्न केलं. गोवा येथे पारंपारिक बंगाली आणि मल्याळी पद्धतीने हे लग्न पार पडलं होतं. 

टॅग्स :मौनी राॅयबॉलिवूड