Join us  

​Happy Birthday : बारा वर्षांनी मोठ्या अमृता सिंहवर कसा जडला सैफचा जीव?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2017 7:05 AM

एकेकाळी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता सिंह हिचा आज (९ फेबु्रवारी) वाढदिवस. अमृता सिंह हिचे नाव आले की, ...

एकेकाळी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता सिंह हिचा आज (९ फेबु्रवारी) वाढदिवस. अमृता सिंह हिचे नाव आले की, सगळ्यांना आठवते ती केवळ सैफ अली खानची एक्सवाईफ किंवा बॉलिवूड डेब्यूसाठी आतूर झालेली सारा अली खान हिची आई. खरे तर अमृता सैफपेक्षा १२ वर्षांनी मोठी होती. पण तरिही या दोघांमध्ये प्रेम बहरले आणि दोघांनी लग्नही केले. सैफ आणि अमृताची प्रेमकथा कुठून आणि कशी सुरु झाली, ते आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.अमृता सिंग ही एकेकाळची टॉपमोस्ट हिरोईन होती. तिने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिलेत. सनी देओलसोबत तिची जोडी सर्वाधिक हिट राहिली. अनिल कपूर ते संजय दत्त या सर्वांसोबत तिने काम केले. याच काळात तिची सैफ अली खानसोबत ओळख झाली. सैफ अली खान सिनेमात येण्यासाठी स्ट्रगल करत होता आणि अमृता बॉलिवूडची टॉपची हिरोईन होती.सैफ व अमृता एकमेकांना भेटले तेव्हा सैफ उणापुरा २१ वर्षांचा होता आणि अमृता ३३ वर्षांची होती. पहिल्याच भेटीत सैफ व अमृता जणू एकमेकांचे झाले. काही दिवसांच्या डेटींगनंतर अमृता व सैफ या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता. दोघांच्या कुटुंबीयांसाठीही हा निर्णय आश्चर्यचकित करणारा होता. पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सैफ व अमृताने कुणाचीही पर्वा न करता लग्न करण्याचा निर्णय घेतला. आक्टोबर १९९१ मध्ये दोघांचेही धूमधडाक्यात लग्न झाले आणि अमृता छोट्या नवाबची बेगम बनली.लग्नानंतर दोघांना दोन मुले झालीत. पण १४ वर्षांच्या यशस्वी सहजीवनानंतर अचानक एक वादळ आले आणि दोघांच्याही नात्यात कायमची दरी निर्माण करून निघून गेले. एका ट्रिपदरम्यान सैफची ओळख इटालियन मॉडेल रोझासोबत झाली. यानंतर सैफ अमृताला विसरून रोझाच्या प्रेमात वेडा झाला. रोझाच्या प्रेमात तो इतका गढून गेला की, तिच्यासाठी त्याने अमृताला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.सैफ आणि अमृताचे लग्न जितके धक्कादायक होते. तितकाच त्यांच्या घटस्फोटाची बातमीही धक्कादायक होती. अमृतसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सैफ रोझासोबत राहू लागला.पण अचानक सैफ व रोझा दोघांचेही बिनसले. कारण या काळात सैफच्या आयुष्यात करिना कपूरची एन्ट्री झाली होती.सैफ करिनाला भेटला आणि कायमचा तिचा झाला. २०१२ मध्ये त्याने करिनाशी लग्न ककेले. अलीकडे करिना व सैफला मुलगा झाला.ALSO READ :  अमृताला खटकला साराचा शॉर्ट टॉप!करिनाच्या प्रेग्नंसीबाबत विचारले अन् अमृता सिंग संतापल्या ..