Join us  

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हृतिक रोशनने शेअर केला असा फोटो, पाहणारे पाहतच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2022 5:21 PM

करण जोहरसुद्धा (karan Johar) कमेंट करण्यास स्वतःला रोखू शकला नाही.हृतिकच्या या फोटोवर त्यानेही कमेंट केली आहे. फायर इमोजी शेअर करत अनेक सेलिब्रिटीसुद्धा पोस्टवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन (Hritik Roshan) 47 वर्षांचा झाला असला तरी त्याची फॅन फॉलोइंग कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. बॉलीवूडचा हँडसम हिरो हृतिक चाहता वर्ग जगभरात आहे. सोशल मीडियावर तो प्रचंड सक्रीय असून त्याच्या खास अपडेट चाहत्यांसह शेअर करताना दिसतो. फोटो व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो.

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी हृतिक रोशन सध्या आपल्या कुटुंबासह मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. हृतिक रोशनने नवीन वर्ष 2022 ची सुरुवात अतिशय वेगळ्या अंदाजात केली आहे.शर्टलेस होऊन आपली पिळदार बॉडी दाखवत हृितिक समुद्र किनाऱ्यावर फुल ऑन एन्जॉय करताना दिसला.  शर्टलेस सेल्फी शेअर करत हृतिकने चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या या फोटोत त्याची  पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे.

 

करण जोहरसुद्धा (karan Johar) कमेंट करण्यास स्वतःला रोखू शकला नाही.हृतिकच्या या फोटोवर त्यानेही कमेंट केली आहे. फायर इमोजी शेअर करत अनेक सेलिब्रिटीसुद्धा पोस्टवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर हृतिकच्या या फोटोने चांगलाच धुमाकुळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 'विक्रम वेधा' या चित्रपटात सैफ अली खान (Saif ALi khan) आणि राधिका आपटे (Radhika Apte) सोबत दिसणार आहे. नुकतेच अबुधाबीमध्ये या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट यावर्षी 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो दीपिका पदुकोण (Deepika Padukon) आणि अनिल कपूरसोबत (Anil Kapoor) 'फाइटर'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) करत आहे.

टॅग्स :हृतिक रोशनकरण जोहर