Join us

‘हाफ गर्लफ्रेंड ’ म्युझिक कॉन्सर्ट...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST

मोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटाचा म्युझिक कॉन्सर्ट नुकतीच मुंबईत पार पडली. या कॉन्सर्टला मोहित सुरी, अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर यांनी चाहत्यांसोबत धम्माल केली. चाहत्यांनी अर्जुनला आग्रह केला की, ‘श्रद्धाला प्रपोझ कर’ चाहत्यांची इच्छा तो कशी काय नाकारू शकणार होता? तसेच फोटो, सेल्फी, गाणी अशा वातावरणात कॉन्सर्ट पार पडली.

मोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटाचा म्युझिक कॉन्सर्ट नुकतीच मुंबईत पार पडली. या कॉन्सर्टला मोहित सुरी, अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर यांनी चाहत्यांसोबत धम्माल केली. चाहत्यांनी अर्जुनला आग्रह केला की, ‘श्रद्धाला प्रपोझ कर’ चाहत्यांची इच्छा तो कशी काय नाकारू शकणार होता? तसेच फोटो, सेल्फी, गाणी अशा वातावरणात कॉन्सर्ट पार पडली. चाहत्यांसोबत सेल्फी घेण्याचा मोह श्रद्धालाही आवरता आला नाही.कॉन्सर्टला श्रद्धा-अर्जुन यांची एन्ट्री होताच अशी सुरेख आतषबाजी करण्यात आली.चाहत्यांमध्ये त्यांच्याशी गप्पाटप्पा मारण्याची श्रद्धाची इच्छा होती. त्यामुळे ती प्रेक्षकांत जात असताना अर्जुनने तिला स्टेजच्या खाली येण्यासाठी अशी मदत केली.कॉन्सर्टला अर्जुन आणि श्रद्धा यांनी गाणी परफॉर्म केली.चाहत्यांच्या खास आग्रहामुळे अर्जुनने त्याच्या खास शैलीत श्रद्धाला असे प्रपोझ केली. हाऊ रोमँटिक़..!हाफ गर्लफ्रेंड चित्रपटात श्रद्धाच्या व्यक्तिरेखेला गायिका व्हायचे असते. त्यामुळे येथे खास फर्माईशनुसार तिने सर्वांना भुरळ पाडणारे गाणे परफॉर्म केले.मोहित सुरी, अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली.श्रद्धाला पाहताच गर्दीने तिच्या नावाचा पुकारा करायला सुरूवात केली. मग तिनेही त्या गर्दीकडे पाहून फ्लार्इंग किस देऊन त्यांच्या प्रेमाचा स्विकार केला.वेस्टर्न अवतारात याठिकाणी श्रद्धा कपूर अतिशय क्यूट दिसत होती. तिने फोटोग्राफर्सना यावेळी अशी पोझ दिली.‘लव्ह यू अर्जुन...’ म्हणणाऱ्या गर्दीला अर्जुन कपूरने ‘हाय’ करून त्यांना ग्रीट केले.अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी फोटोग्राफर्सला अशी स्टायलिश पोझ दिली.त्यांना भेटायला आलेल्या गर्दीसोबत सेल्फी काढायला ते दोघे विसरले नाहीत.