Join us  

रणवीर सिंगच्या इन्स्टाग्रामवर आलेली ही कमेंट घेतेय सगळ्यांचे लक्ष वेधून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 6:50 PM

रणवीरने फोटो पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे चाहते भरभरून या फोटोला लाइक करत आहेत. तसेच कमेंट देखील करत आहेत. पण या सगळ्यात एक कमेंट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

ठळक मुद्देगली बॉय या चित्रपटातील रणवीरची भूमिका बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना देखील खूप आवडली आहे आणि हा चित्रपट पाहून त्यांनी रणवीरसाठी एक भेटवस्तू पाठवली आहे.रणवीर सिंगला नुकताच अमिताभ बच्चन यांच्याकडून एक फुलांचा गुच्छा आणि पत्र मिळाले आहे. त्यानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे.

रणवीर सिंग आणि अलिया भट्टच्या अभिनयाने सजलेल्या ‘गली बॉय’ने बॉक्स ऑफिसवर शानदार यश मिळवले. रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केला आणि आठव्या दिवशी थेट १०० कोटींवर मुसंडी मारली. ‘गली बॉय’ आता शंभर कोटी क्लबमध्ये सामील झाला असून या चित्रपटातील रणवीर, अलिया यांच्या भूमिकेचे तसेच या चित्रपटाच्या कथेचे सगळेच कौतुक करत आहेत. या चित्रपटातील रणवीरची भूमिका बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना देखील खूप आवडली आहे आणि हा चित्रपट पाहून त्यांनी रणवीरसाठी एक भेटवस्तू पाठवली आहे.

अमिताभ बच्चन यांनी केवळ रणवीरलाच नव्हे तर या चित्रपटातील महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या सगळ्यांनाच स्वतःच्या हाताने लिहून एक पत्र पाठवले आहे. रणवीर सिंगला नुकताच अमिताभ बच्चन यांच्याकडून एक फुलांचा गुच्छा आणि पत्र मिळाले आहे. त्यानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. त्याने इन्स्टाग्रावर या भेटवस्तूचा फोटो पोस्ट करून त्यासोबत सबसे खास असे लिहिले आहे. रणवीरने हा फोटो पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे चाहते भरभरून या फोटोला लाइक करत आहेत. तसेच कमेंट देखील करत आहेत. पण या सगळ्यात एक कमेंट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. रणवीरच्या या इन्स्टाग्रामच्या फोटोवर अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदाने कमेंट केली असून हार्टचा इमोजी पोस्ट केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी रणवीरप्रमाणेच अलिया भट, सिद्धांत चर्तुवेदी आणि विजय वर्मा यांना देखील भेटवस्तू पाठवल्या आहेत. गली बॉय या चित्रपटातील एमसी शेर ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ही भूमिका सिद्धांत चर्तुवेदीने साकारली आहे. सिद्धांतने या चित्रपटाच्या आधी इनसाइड एज या वेबसिरिजमध्ये काम केले होते. त्याच्या या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक झाले होते. गल्ली बॉय हा त्याचा पहिलाच चित्रपट असून सिद्धांतने त्याच्या पहिल्याच चित्रपटात सिक्सर मारला आहे. 

 

टॅग्स :रणवीर सिंगआलिया भटगली ब्वॉय