Join us  

OMG! ‘गली बॉय’ का सीक्वल आएगा...!!  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 2:46 PM

‘गली बॉय’च्या प्रेमात पडलेल्या सिनेप्रेमींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. होय, या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सीक्वल आणण्याचा विचार दिग्दर्शिका झोया अख्तरने चालवला आहे.

ठळक मुद्दे देशाच्या हिप हॉप संस्कृतीवर अधिक सविस्तर भाष्य करणारा आणखी एक चित्रपट घेऊन येण्याची आमची इच्छा आहे. सध्या या स्क्रिप्टवर काम सुरु आहे, असे झोयाने सांगितले.  

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या अभिनयाने सजलेला ‘गली बॉय’ बॉक्सआॅफिसवर सुपरडुपर हिट ठरला. १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. मुंबईच्या  झोपडपट्टीत राहणा-या आणि रॅपर होणाच्या स्वप्नाने पछाडलेल्या एका तरूणाची ही कथा प्रेक्षकांना इतकी भावली की, लोकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला. चित्रपटातील रणवीर व आलियाचा अभिनय असो की, रणवीरचा रॅपर अवतार सगळेच प्रेक्षकांना भावले. याच ‘गली बॉय’च्या प्रेमात पडलेल्या सिनेप्रेमींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. होय, या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सीक्वल आणण्याचा विचार दिग्दर्शिका झोया अख्तरने चालवला आहे.एका ताज्या मुलाखतीत झोयाने याबाबतचे संकेत दिले. ‘गली बॉय’च्या पुढच्या भागाबद्दल मी विचार करतेय. भारतातल्या हिप-हॉप संस्कृतीबद्दल अजून खूप काही सांगण्यासारखे आहे, असे मला आणि माझी सहलेखिका रीमा कागती आम्हा दोघींनाही वाटतेय. त्यामुळेच आम्ही आणखी एक चित्रपट प्लान करतोय.   देशाच्या हिप हॉप संस्कृतीवर अधिक सविस्तर भाष्य करणारा आणखी एक चित्रपट घेऊन येण्याची आमची इच्छा आहे. सध्या या स्क्रिप्टवर काम सुरु आहे, असे झोयाने या मुलाखतीत सांगितले.  

झोयाने या चित्रपटाबद्दल आणखी माहिती देण्याचे टाळले. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट केली. ती म्हणजे, तिच्या या आगामी चित्रपटात तिचा भाऊ फरहान अख्तर नसेल. तुम्हाला ठाऊक असेलच की, ‘गली बॉय’  हा झोयाचा पहिला चित्रपट आहे, ज्यात फरहान दिसला नाही. यापूर्वीच्या झोयाच्या सगळ्या चित्रपटात फरहान होता.

‘गली बॉय’मध्ये फरहानला का घेतले नाही, हेही झोयाने यावेळी स्पष्ट केले. ‘गली बॉय’मध्ये फरहान फिट बसत नव्हता. रॉक आॅन सारख्या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या मनात फरहानबद्दलची एक इमेज आधीच तयार झाली होती. तो ‘गली बॉय’मध्ये असता तर लोकांच्या ते पचनी पडले नसते. त्यामुळे मी ‘गली बॉय’मध्ये त्याला घेणे टाळले, असे तिने सांगितले. 

टॅग्स :गली ब्वॉयरणवीर सिंगआलिया भट