Join us  

गोविंदाच्या मोलकरणीकडे होत्या तब्बल ८ गाड्या, मग अभिनेत्याच्या घरात काम करण्याची का आली होती तिच्यावर वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 4:52 PM

Govinda : अभिनयाव्यतिरिक्त गोविंदा त्याच्या डान्सिंग आणि अप्रतिम कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो.

अभिनयाव्यतिरिक्त गोविंदा (Govinda) त्याच्या डान्सिंग आणि अप्रतिम कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो. ९० च्या दशकात गोविंदाच्या स्टारडमशी स्पर्धा करणारे कोणीच नव्हते. त्याची एक झलक पाहण्यासाठी तरुणी धडपडायच्या. पण एकदा एक चाहती गोविंदाच्या जवळ जाण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली होती. याचा खुलासा गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांनी एका मुलाखतीदरम्यान केला आहे.

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत सुनीता यांनी गोविंदाच्या एका चाहतीचा इंटरेस्टिंग किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की, 'ती खूप श्रीमंत कुटुंबातील होती. एके दिवशी मी तिला माझ्या घराबाहेर उभे असलेले पाहिले आणि विचारले तुला काम हवे आहे का? माझ्या आईशी बोल. ती घरातील सर्व कामे पाहते. माझ्या आईने तिला घरगुती कामासाठी ठेवले.

गोविंदाने पुढे सांगितले की ती कामात चांगली नव्हती, पण जेव्हा मी घरी होतो तेव्हा ती खूप सक्रिय होती. तिचे वर्तणूक पाहून सुनीताला जरा संशय आला आणि तिला वाटले की काहीतरी गडबड आहे. सुनीता म्हणाली, 'एक दिवस ती फोनवर बोलत होती, म्हणून मी तिच्याकडून फोन हिसकावून घेतला. ती तिच्या वडिलांशी बोलत होती. तेव्हा मला कळले की ती खूप मोठ्या कुटुंबातील आहे आणि तिच्या वडिलांकडे आठ गाड्या आहेत.

गोविंदाने ११ मार्च, १९८७ रोजी सुनीतासोबत गुपचूप लग्न केले होते. मुलगी टीनाच्या पहिल्या वाढदिवशी त्याने आपल्या लग्नाचा खुलासा केला. गोविंदाने 'कुली नंबर १', 'राजा बाबू', 'हिरो नंबर १', 'आंखियों से गोली मारे', 'स्वर्ग', 'साजन चले ससुराल', 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'नसीब' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

टॅग्स :गोविंदा