गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) पुन्हा एकत्र दिसले आहेत. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, या जोडप्याने गणपती बाप्पाचे एकत्र स्वागत केले आणि पापाराझींना मिठाई वाटली. इतकेच नाही तर दोघांनीही एकत्र पोज देखील दिल्या. अलीकडेच सुनीता आहुजाने गोविंदावर 'फसवणूक' केल्याचा आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे वृत्त समोर आले होते. पण आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सुनीता आणि गोविंदा एकत्र दिसले आहेत.
गोविंदा आणि सुनीता यांनी एकत्र गणेश चतुर्थी साजरी केली आहे. दोघांनीही एकत्र गणपती बाप्पाचे स्वागत केले. यावेळी या जोडप्याने पापाराझींना मिठाई वाटली. फोटोंमध्ये दोघांच्या चेहऱ्यावर उत्सवाचा आनंद स्पष्ट दिसत आहे. गणपती उत्सवादरम्यान गोविंदा आणि सुनीता मरून पोशाखात दिसले. सुनीता मरून रंगाची सिल्क साडी आणि केसात गजरा घालून सुंदर दिसत होती.
गोविंदाने देखील मरून रंगाचा कुर्ता घालून खूपच सुंदर दिसत होता. अभिनेत्याने गोल्डन शाल घेऊन आपला लूक पूर्ण केला. यावेळी गोविंदा आणि सुनीता यांनी एकत्र पोजही दिल्या. त्यांनी गणपती बाप्पासोबत फोटोही काढले. त्यांचा मुलगा यशवर्धन देखील त्यांच्यासोबत गणपतीची पूजा करताना दिसला.