Join us

​गोविंदाने सुरू केले ‘हिरो नंबर वन’ रेस्टॉरेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 22:01 IST

बॉलिवूड अभिनेता गोविंदाने दिल्लीमध्ये एक रेस्टॉरेंट सुरू केले आहे. विशेष म्हणजे या रेस्टॉरेंटचे नाव त्याने आपल्या चित्रपटाच्या नावावर ठेवले ...

बॉलिवूड अभिनेता गोविंदाने दिल्लीमध्ये एक रेस्टॉरेंट सुरू केले आहे. विशेष म्हणजे या रेस्टॉरेंटचे नाव त्याने आपल्या चित्रपटाच्या नावावर ठेवले आहे. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘हिरो नंबर वन’ या गोविंदाच्या सुपरहिट चित्रपटांचे नाव त्याने रेस्टॉरेंटला दिले आहे. नवी दिल्लीच्या पश्चिम भागात असलेले हे रेस्टॉरेंटचे उद्घाटन करताना गोविंदा म्हनाला, माझे दिल्लीशी व येथील लोकांशी व संस्कृतीशी एक आगळे वेगळे नाते आहे. माझ्या मित्रांनी रेस्टॉरेंट उघडण्याचा सल्ला दिला. दिल्लीच्या लोकांना नंबर वन जागेची गरज आहे असे ते म्हणाले होते. जेथे चांगले संगीत, चांगले भोजन व उत्कृष्ट वातावरण त्यांना मिळावे अशी दिल्लीकरांची इच्छा आहे असे त्यांचे मत होते. तुमच्यासोमर हे नंबर वन सादर करताना मला या गोष्टी सांगाव्याश्या वाटतात कारण हेच नंबर वन आहे. यावेळी त्याची पत्नी सुनीता व मुलगी टीना देखील उपस्थित होत्या. या रेस्टॉरेंटचे संचालक म्हणाले, आम्ही हिरो नंबर वनमध्ये लोकांसाठी अशी जागा तयार केली आहे जेथे विविध व्यंजने व लाईव्ह संगीताचा आनंद घेता येणार आहे. यासोबतच येथे पार्टी लव्हर्ससाठी देखील विशेष सोय असेल. एकेकाळी बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असलेला गोविंदा अभिनयापासून दूर आहे. मध्यंतरी त्याने राजकारणात आपले नशीब आजमावले होते. मात्र यात तो फार काळ टीकू शकला नाही. आता पुन्हा एकदा तो बॉलिवूडमध्ये सक्रिय होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे.