Join us  

GOOD NEWS! करीना कपूर खानची इंस्टाग्रामवर एन्ट्री, शेअर केली फर्स्ट पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 4:21 PM

करीनाने अखेर इंस्टाग्रामवर पदार्पण केले आहे

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. करीनाने अखेर इंस्टाग्रामवर पदार्पण केले आहे आणि तिने पहिली पोस्टदेखील शेअर केली आहे. करीनाचे इंस्टाग्रामवर जवळपास ६ लाख फॉलोव्हर्स आहेत. तिने अद्याप कुणालाच फॉलो केलेले नाही.

करीना कपूर खानने इंस्टाग्राम अकाउंटवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. एका फोटोत तिने सांगितले की ती लवकरच डेब्यू करणार आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये ती छानशा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, बॅगेतून मांजर बाहेर पडली. 

इंस्टाग्रामवर येण्याबाबत करीना कपूर खानने सांगितले होते की, मला माहित आहे की माझ्या फॅन क्लब पेजवर ६-७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. माझे खूप सारे चाहते हे पेज चालवतात. मी हे सांगू शकते की लवकरच माझं अधिकृत पेज असणार जे वेळ आलं की बनेल. मात्र ते कुणीतरी दुसरं चालवणार. या अकाउंटवर माझं काम आणि चित्रपटांची अपडेट असेल. मात्र काहीच पर्सनल नसणार आहे.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर इरफान खानसोबत ती अंग्रेजी मीडियममध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १३ मार्चला रिलीज होणार आहे. याशिवाय ती करण जोहरच्या मल्टीस्टारर चित्रपट तख्तमध्ये झळकणार आहे. तसेच आमीर खानची मुख्य भूमिका असलेला चित्रपट लाल सिंग चड्ढा चित्रपटातही ती दिसणार आहे. यादोघांव्यतिरिक्त मोना सिंगदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहे.करीना कपूर शेवटची गुड न्यूज चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

टॅग्स :करिना कपूरइन्स्टाग्राम