Join us

Good News! कर्करोगावर इमरान हाश्मीच्या मुलाची यशस्वी मात, भावूक होऊन शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 18:42 IST

अभिनेता इमरान हाश्मीचा मुलगा अयानला २०१४ साली मूत्रपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते.

ठळक मुद्देइमरान हाश्मीच्या मुलाची कर्करोगावर यशस्वीरित्या मात

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीचा पाच वर्षाचा मुलगा अयानने कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली आहे. अयानला २०१४ साली मूत्रपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर आता अयानचा कर्करोग बरा झाला आहे. अशी माहिती इमरानने सोशल मीडियावर दिली आहे.

इम्रानने ट्विटरवर अयानसोबतचा एक फोटो शेअर करत भावक पोस्ट लिहिली. ‘पाच वर्षानंतर अखेर अयान कर्करोगातून मुक्त झाला आहे. या आजारावर त्याने यशस्वीरित्या मात केली आहे. हे पाच वर्ष म्हणजे आमच्यासाठी फार मोठा आणि अवघड असा काळ होता. मात्र तुमच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळेच अयान यातून सुखरूपपणे बाहेर पडला आहे. कर्करोगासारख्या आजाराशी सामना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेम, आशीर्वाद, आधार आणि विश्वास या गोष्टींची गरज असते. त्यामुळे या काळात आपण त्यांच्यासोबत असणे गरजेचे असते’, असे इमरानने लिहिले. 

दरम्यान, अभिनेता इमरान हाश्मीने अयानच्या या आजारपणाच्या काळात ‘द किस ऑफ लाईफ: हाऊ अ सुपरहिरो अँड माय सन डिफिटेड कॅन्सर’ हे पुस्तक लिहीले. या पुस्तकात इमरानने अयानच्या कॅन्सरवरील उपचारादरम्यानचे अनुभव आणि प्रसंग लिहिले आहेत.

टॅग्स :इमरान हाश्मी