Join us

यूएसला जाण्यापूर्वी अनुष्का शर्माने केले 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 11:11 IST

अनुष्का शर्मा बर्थ डे सेलिब्रेट करुन झाल्यानंतर लवकरच झिरोच्या शूटिंगसाठी यूएसला रवाना होणार आहे. परदेशात जायच्या आधी अनुष्काने एक ...

अनुष्का शर्मा बर्थ डे सेलिब्रेट करुन झाल्यानंतर लवकरच झिरोच्या शूटिंगसाठी यूएसला रवाना होणार आहे. परदेशात जायच्या आधी अनुष्काने एक गोष्टी विशेष काळजी घेतली आहे ती म्हणजे खाण्या-पिण्याची होय, तुम्ही बरोबर वाचलात अनुष्काने यूएसला जाण्यापूर्वी तिने एक शेफची नियुक्ती केली आहे.  अनुष्कासाठी हा शेफ यूएसमध्ये शुद्धा शाकाहारी जेवण बनवणार आहे.  हा शेफ अनुष्का जेवढे दिवस यूएसमध्ये राहाणार तेवढे दिवस हॉटेल ते शूटिंगपर्यंत तिला जेवण तयार करुन देणार. ज्या पद्धतीने विराट कोहली आपल्या फिटनेसला घेऊन जागरुक आहे त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षांपासून अनुष्का शर्माने देखील आपली लाईफस्टाइल बदलली आहे.  तीन वर्षांपासून अनुष्काने नॉन-व्हेज खाणं बंद केले आहे. ऐवढेच नाही तर तिने दुधजन्य पदार्थ खाणं देखील बंद केले आहे. अनुष्का काही दिवसांपूर्वी तिचा झिरोच्या सेटवरचा फोटो व्हायरल झाला होता. झिरोमध्ये तिचा प्रोस्थेटिक मेकअप आहे. जो करण्यासाठी तिला 2 ते 3 तासांचा कालावधी लागतो. 'झिरो'मध्ये अनुष्कासह शाहरुख खान आणि कॅटरिना कैफची देखील महत्त्वाची भूमिका आहे. शाहरुख खान या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील  शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुस-या लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरेल. ‘गेम आॅफ थ्रोन्स’ प्रेक्षकांच्या आवडीची शृंखला आहे. या चित्रपटात अनेक व्हिज्युअल इफेक्ट्स दिसणार आहेत. ख्रिसमला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ALSO READ :  इटलीत लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला तुम्ही ओळखता काय?नुकतीच अनुष्काने वरुण धवनसोबत 'सुई धागा' ची शूटिंग पूर्ण केली आहे. या चित्रपटात वरुण धवन टेलरच्या भूमिकेत झळकणार असून 'मौजी' असं त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव असेल.दुसरीकडे अनुष्का कपड्यांवर नक्षीकाम (एम्ब्रॉयडरी) करणा-या ममताच्या भूमिकेत झळकणार आहे.'मेड इन इंडिया' अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमाची कथा मध्य प्रदेशात रंगणार आहे. यशरत कटारिया 'सुई धागा' या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून मनीष शर्मा सिनेमाचे निर्माते आहेत.यशराज बॅनरचा हा सिनेमा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.