Join us  

अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियाचे ग्लॅमरस फोटो पाहिलात का ?, लॉकडाऊनमध्ये असे करतेय एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 12:01 PM

सध्या लॉकडाऊनमध्ये जॉर्जिया बॉयफ्रेंड अरबाज खानसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे.

लॉकडाऊनमध्ये अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीचे काही नवे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये जॉर्जिया खूपच ग्लॅमरस दिसतेय. जॉर्जिया सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिचे हॉट अँड बोल्ड फोटो ती इन्स्टाग्रामवर फॅन्ससोबत शेअर करत असते. सध्या लॉकडाऊनमध्ये जॉर्जिया बॉयफ्रेंड अरबाज खानसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे.

काही दिवसांपूर्वी अरबाज खानची शेविंग करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाजच्या आयुष्यात जॉर्जियाची एंट्री झाली. जॉर्जिया अरबाज पेक्षा 22 वर्षांनी लहान आहे. वयात इतकं अंतर असताना ही दोघे एकमेकांसोबत खुश आहेत. अनेक सर्वाजनिक ठिकाणी दोघ एकत्र स्पॉट झाले आहेत. 

जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे. तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे. आता तिने तमीळ वेबसीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. लवकरच ती सिनेमात देखील दिसणार आहे. अरबाजबद्दल बोलायचे झाले तर दबंग3 मध्ये दिसला होता.

टॅग्स :जॉर्जिया एंड्रियानीअरबाज खान