Join us  

वयाच्या ६९व्या वर्षी केलेलं ग्लॅमरस फोटोशूट अभिनेत्रीच्या आलं अंगाशी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 11:32 AM

वयाच्या ६९ व्या वर्षी रजनी चांडीने जीन्स परिधान केल्याने काही लोकांनी त्यांची खिल्ली उडवली.

सोशल मीडिया हे असं माध्यम या माध्यमातून एका रात्रीत काही लोकप्रिय झाले आहेत. जर नेटकऱ्यांना काही खटकलं तर ते एखाद्याला चांगलंच ट्रोल करतात. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री रजनी चांडीला आला आहे. ६९ वर्षीय रजनी चांडीनी ग्लॅमरस फोटोशूट केले. या फोटोशूटवरून तिला चांगलेच ट्रोल केले आहे. 

अभिनेत्री रजनी चांडी यांनी फोटोशूट केले असून ते फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. त्यांनी या फोटोत जीन्स आणि वेस्टर्न आउटफिट घातले आहेत. त्यातील त्यांचा ग्लॅमरस आणि सेक्सी लूक लोकांना भावला नाही. त्यामुळे काही लोकांनी तिला ट्रोल केले तर काही लोकांनी तिच्या नव्या लूकचे कौतूक केले.

वयाच्या ६९ व्या वर्षी रजनी चांडीने जीन्स परिधान केल्याने काही लोकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. काही जणांनी त्यांच्या पोस्टखाली हसणाऱ्या इमोजी टाकल्या आहेत, तर काहींनी त्यांना काकू म्हणून संबोधले आहे.

शिवाय काही लोकांनी तर संतप्त इमोजी देखील कमेंट केला आहे. पण बऱ्याच लोकांना रजनीचा जीन्समधला लूक लेडी जेम्सस बाँडची आठवण करून देत आहे. एका व्यक्तीने म्हटले की त्या नफीजा अलीसारख्या दिसत आहेत.

तर एका ७४ वर्षीय महिलेने रजनीच्या सौंदर्याचे कौतुक करताना म्हटले की, ती खूप सुंदर दिसत असून आम्हाला तुझा अभिमान आहे. काही कमेंट्स सोडल्या तर संपूर्ण कमेंट बॉक्स रजनीच्या कौतुकाने भरलेला दिसत आहे.

इंडिया टुडेशी बोलताना रजनीने सांगितले की, 'लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याचा मी विचारही करत नाही. प्रत्येक वेळी जेव्हा कोणी फोटोशूटबद्दल विचारते तेव्हा मात्र मी अस्वस्थ होते.

लोक ज्या प्रकारे कमेंट्स करत आहेत, ते पाहणे वेदनादायक आहे. खरेतर अपशब्द वापरणारी लोक मला ओळखतही नाहीत. मी असे काय चुकीचे केले, ज्यामुळे लोक माझ्याशी असे वागत आहेत, अशी खंतही व्यक्त केली.