Join us  

गालिब असद भोपाळी यांचा सवाल; प्रौढांनी काय बघावे हे सेन्सॉर बोर्ड कसे ठरवू शकतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 6:06 AM

नवाजुद्दीन सिद्दीकी याचा ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ हा आगामी चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. आधी अभिनेत्री चित्रांगदा सिंह हिने या चित्रपटाच्या ...

नवाजुद्दीन सिद्दीकी याचा ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ हा आगामी चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. आधी अभिनेत्री चित्रांगदा सिंह हिने या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर नको ते आरोप केलेत. यानंतर  यानवाजुद्दीनच्या कधी नव्हे इतक्या बोल्ड आणि इंटिमेट सीन्समुळे   हा चित्रपट चर्चेत आला. त्यातच सेन्सॉर बोर्डाने (पहलाज निहलानी यांच्या अध्यक्षतेखाली) यात कथितरित्या ४८ सीन्स गाळण्याचे आदेश दिल्याने या चित्रपटाची आणखीच चर्चा झाली. याच पार्श्वभूमीवर ‘बाबूमोशाय बंदूकबाज’चे लेखक गालिब असद भोपाळी यांनी ‘सीएनएक्समस्ती’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. एक ग्रामीण पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट लिहितांना त्यावरून इतका वाद होईल, याची मला कल्पना नव्हती, असे भोपाळी यावेळी म्हणाले. त्यांची मते, त्यांच्याच शब्दांत.... प्रश्न : ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ विरूद्ध सेन्सॉर बोर्डाचा वाद गाजतोय. या चित्रपटाचे लेखक या नात्याने ही कथा लिहितांना तुम्ही सेन्सॉर बोर्डाच्या प्रतिक्रियेचा विचार केला होता का?भोपाळी : अजिबात नाही. चित्रपट म्हणजे आपल्या समाजाचे प्रतिबिंब, असे मी मानतो. यात नवाजने बाबूचे पात्र साकारले आहे. तो एक कॉन्ट्रक्ट किलर आहे. हा चित्रपट समाजातील काही कटू सत्यांवर भाष्य करतो. प्रत्यक्षात हा चित्रपट लिहिलांना याच्या कथेवरून इतका वाद होईल, याची मला कल्पना नव्हती. ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ची कथा लिहिण्यापूर्वी मी वास्तव जीवनात अनेकांना भेटलो, संशोधन केले. त्यामुळे परिणामांची चिंता अशी नव्हतीच.सेन्सॉर बोर्डाची भूमिका कशी असायला हवी, असे तुम्हाला वाटते?भोपाळी : ‘बाबूमोशाय बंदूकबाज’मध्ये सेन्सॉर बोर्डाने ४८ कट्स सुचवणे ही लहान गोष्ट नाही. अडीच तासांच्या चित्रपटात ४८ कट्स सुचवले जात असतील तर चित्रपटात आत्माच उरणार नाही. प्रेक्षकांचे प्रतिनिधी म्हणून पाच जण चित्रपट बघतात आणि अनेक वर्षांआधी ठरवलेल्या गाईडलाईन्सनुसार, त्यांना वाटते तो निकाल देतात. माझ्या मते, हा बालिशपणा आहे. माझ्या मते, प्रौढ लोकांनी काय पाहावे, हे सेन्सॉर बोर्ड कसे ठरवू शकते?प्रश्न : ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ पास करण्याच्या प्रक्रियेत राजकीय दबाव आडवा आला असे वाटते का?भोपाळी :  मला याची कल्पना नाही. पण एकूणच सेन्सॉर बोर्डाच्या निकालावर मला आश्चर्य वाटले. ‘साली’हा शब्द बोर्डाने काढायला सांगितला. मात्र त्याचवेळी ‘साला’ या शब्दावर बोर्डाला काहीही हरकत नव्हती. यावरून त्यांना या शब्दांची समज आणि समाजाच्या संदर्भाची जाण नाही, असे मी म्हणतो. या चित्रपटात नवाज साकारत असलेले पात्र समाजाच्या एका खालच्या स्तरातील आहे. समाजाच्या या स्तरात काही शब्द दैनंदिन जीवनाचा भाग आहेत.  हेच शब्द सेन्सॉर बोर्डाला अश्लिल वा आक्षेपार्ह वाटावे, हे माझ्या समजण्यापलीकडचे आहे. प्रश्ल :  दिग्दर्शक कुशन नंदी माझ्याकडून बळजबरीने सेक्स सीन्स करून घेऊ इच्छित होता, असा आरोप अभिनेत्री चित्रांगदा सिंह हिने केला. या वादावर काय सांगाल?भोपाळी :  ‘बाबूमोशाय बंदूकबाज’चे शूटींग सुरु होण्यापूर्वीच आम्ही चित्रांगदाला सगळी स्क्रिप्ट दिली होती. चित्रपट बोल्ड आहे, याची तिला कल्पना होतीच. स्क्रिप्टमध्ये कुठलाही बदल होणार नाही, हेही आम्ही तिला आधीच सांगितले होते. पण प्रत्यक्षात शूटींग सुरु झाले अन् चित्रांगदा अनेक सीन्समध्ये बदल सुचवण्याचा आग्रह करू लागली. चित्रपट महिलाप्रधान असावा, असे तिचे मत होते. अखेर आम्ही तिला काढायचा निर्णय घेतला. यानंतर नवी हिरोईन शोधावी लागली,यात आमच्या चित्रपटाचा खोळंबा झाला.प्रश्न : कोलकात्यात या चित्रपटाचे शूटींग झाले. तिथे तुम्हाला काही वाईट अनुभव आलेत, काय सांगाल?भोपाळी : होय, आम्ही कोलकात्याला शूटींगसाठी गेलोत. पण याठिकाणी आम्हाला अनेक वाईट अनुभव आलेत. त्यांच्या असोसिएशनची कामाची पद्धतच निराळी आहे. या अडचणी बघता आम्ही कोलकात्याऐवजी बिहारमध्ये शूटींगचा निर्णय घेतला.  प्रश्न : नवाजुद्दीन यात लीड रोलमध्ये आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल?भोपाळी : नवाजुद्दीन हाच या चित्रपटासाठी आमची पहिली चॉईस होता. तो एक महान कलाकार आहे. त्याने यातील भूमिकेला शंभर टक्के न्याय दिला.प्रश्न : बॉलिवूडमध्ये आपण २५ वर्षे पूर्ण केलीत. या प्रवासाबद्दल काय सांगाल?भोपाळी :  हा प्रवास अतिशय सुंंदर राहिला. मी अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून करिअरला सुरुवात केली. यानंतर मला काहींनी पटकथा लिहायची गळ घातली आणि पुढे मालिका व चित्रपट लिहिता लिहिता मी पटकथाकार झालो.प्रश्न : आपले नवीन प्रोजेक्ट काय?cnxoldfiles/strong> मी सध्या दोन चित्रपटात बिझी आहे. एक म्हणजे ‘फिरकी’ आणि दुसरा म्हणजे, ‘त्रिदेव.’ हे दोन्ही चित्रपट थ्रिलर कॉमेडी आहेत. ‘फिरकी’मध्ये जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश आणि के के मेनन मुख्य भूमिकेत आहेत. लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरू होणार आहे.