Join us  

कोरोनानंतर जेनेलिया शूटींगवर परतली, शेअर केला सेटवरील मस्तीचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 3:59 PM

जेनेलिया या व्हिडीओत तिच्या मेकअप आर्टिस्टसोबत आहे. ज्याने प्रोटेक्टिव किट आणि फेस शील्ड घातलेलं आहे. जेनेलिया व्हॅनिटी मिररसमोर आहे.

अभिनेत्री जेनेलिया डिसुझा कोरोना व्हायरसला मात देऊन शूटींगवर परतली आहे. तिनेच सोशल मीडियावरून कामावर परतल्याची माहिती दिली आहे. जेनेलियाने एक शूटींग सेटवरील एक मजेदार व्हिडीओ शेअर केलाय. यात ती मेकअपरूममध्ये मस्ती करताना दिसत आहे. 

जेनेलिया या व्हिडीओत तिच्या मेकअप आर्टिस्टसोबत आहे. ज्याने प्रोटेक्टिव किट आणि फेस शील्ड घातलेलं आहे. जेनेलिया व्हॅनिटी मिररसमोर आहे. जेनेलियासोबत तिचा पाळीव कुत्राही दिसतोय. जेनेलिया शूटींगवर परत येऊन फार आनंदी दिसते आहे. (जेनेलियाच्या फॅन्ससाठी खुशखबरी, पती रितेश देशमुखसोबत करणार कमबॅक)

मीडिया रिपोर्ट्सनुसार जेनेलिया डिसुझा आणि तिचा पती अभिनेता रितेश देशमुख एका प्रोजेक्टवर एकत्र काम करत आहेत. पण हे अजून पूर्णपणे समजू शकलं नाही की, जेनेलिया सध्या कशाचं शूटींग करत आहे. दरम्यान जेनेलियाचा कोरोना रिपोपर्ट पॉझिटिव्ह आल्याचं ती कोरोनातून बरी झाल्यावर समोर आलं होतं. ETimes सोबत बोलताना तिने सांगितले होते की, यादरम्यान एकटं राहणं सर्वात चॅलेंजिंग काम होतं. कुणाच्या पावलांचा आवजही येत नव्हता. हे फारच कठिण होतं. ज्याप्रकारे रितेशने मुलांना सांभाळलं ते कौतुकास्पद आहे. 

दरम्यान, अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलियाने एकत्र २००३ साली तुझे मेरी कसम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या दोघांनी तुझे मेरी कसम चित्रपटाशिवाय मस्ती, तेरे नाल लव हो गया चित्रपटात काम केले आहे. २०१२ साली जेनेलिया आणि रितेश विवाहबंधनात अडकले. त्यांना दोन मुले आहेत राहिल आणि रियान.

प्रभात खबरच्या रिपोर्टनुसार, खऱ्या आयुष्यातील हे जोडपे रील लाइफमध्ये काम करताना दिसणार आहे. जेनेलियाने सांगितले की, हा खूप मोठा काळ आहे. मला आशा आहे की मला संधी मिळेल. वास्तविकतेत मी सध्या काही इंटरेस्टिंग स्क्रीप्ट वाचते आहे. त्यावर रितेश म्हणाला की, बस आता याला होकार दे. (जेनेलिया देशमुखने 21 दिवसानंतर कोरोना रिपोर्टबद्दल केला खुलासा, लिहिली भावूक पोस्ट)

लहान मुलांच्या संगोपनाबद्दल जेनेलिया म्हणाली की, मला वाटते की मुलांसाठी ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही जीवनाचा अनुभव घेणे खूप महत्त्वपूर्ण आहे. हे तथ्य पाहता रितेश शहर आणि ग्रामीण भागात वाढला आहे. पण मुलांना फक्त शहरी संगोपन दिले आहे. मुलांना प्रकृती आणि प्राण्यांच्या जवळ ठेवणे चांगले असते.  

 

टॅग्स :जेनेलिया डिसूजाबॉलिवूडकोरोना वायरस बातम्या