‘गोलमाल अगेन’च्या गाण्यावरचा गौहर खानचा डान्स तुम्ही एकदा बघाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 15:59 IST
‘गोलमाल अगेन’या चित्रपटासोबतच या चित्रपटातील गाणीही लोकांनी डोक्यावर घेतली. ‘आते जाते...’ हे चित्रपटाचे गाणे चांगलेच हिट झाले. अनेकांनी या गाण्यावरचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलेत. आता या यादीत गौहर खान हिचेही नाव सामील झाले आहे.
‘गोलमाल अगेन’च्या गाण्यावरचा गौहर खानचा डान्स तुम्ही एकदा बघाच!
रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या अजय देवगणच्या ‘गोलमाल अगेन’ने बॉक्सआॅफिसवर धूम केली. २०० कोटींचा गल्ला जमवत हा चित्रपट यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला. या चित्रपटासोबतच या चित्रपटातील गाणीही लोकांनी डोक्यावर घेतली. ‘आते जाते...’ हे चित्रपटाचे गाणे चांगलेच हिट झाले. हे गाणे सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ या सुपरडुपर हिट चित्रपटातील ‘आते जाते...’ गाण्याचे रिमेक व्हर्जन आहे. ‘गोलमाल अगेन’ चित्रपटगृहांत नाही पण या गाण्याची लोकांवरची जादू अद्यापही कायम आहे. अनेकांनी या गाण्यावरचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलेत. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. होय, आता या यादीत गौहर खान हिचेही नाव सामील झाले आहे. अभिनेत्री गौहर खानही या गाण्याच्या प्रेमात पडलीय. इतकी की, या गाण्यावर थिरकण्यापासून ती स्वत:ला रोखू शकली नाही. गौहरने आपला हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात गौहर मेल्विन लुईस नामक कोरिओग्राफरसोबत थिरकताना दिसतेय. खरे तर गौहरचा हा डान्स व्हिडिओ १२ नोव्हेंबरलाच यु-ट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. पण तो आत्ता कुठे व्हायरल होतो आहे. गौहर खानच्या या व्हिडिओने आत्तापर्यंत अनेकांना वेड लावले आहे. तुम्ही तो बघा आणि कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपल्या प्रतिक्रिया लिहू शकता.रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल अगेन’ यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाला होता. यात अजय देवगण, अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू, परिणीती चोप्रा, तब्बू असे स्टार्स दिसले होते.