हृतिक तयार करणार फॅन्ससाठी गेम्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 22:29 IST
हृतिक रोशन याने एका मोबाईल कंपनीशी हात मिळवून आता त्याच्या फॅन्ससाठी गेम्स तयार करण्यासाठी पाऊल उचलले आहे. दैनंदिन आयुष्यात ...
हृतिक तयार करणार फॅन्ससाठी गेम्स
हृतिक रोशन याने एका मोबाईल कंपनीशी हात मिळवून आता त्याच्या फॅन्ससाठी गेम्स तयार करण्यासाठी पाऊल उचलले आहे. दैनंदिन आयुष्यात फॅन्सला जवळ आणण्यासाठी हे करत असल्याचे त्याने सांगितले. त्याने ‘नजारा गेम्स’(मोबाईल गेम पब्लिशर) सोबत हातमिळवणी केली आहे. हृतिक म्हणाला,‘ सध्याच्या युवक ांच्या आयुष्यात गेमिंग हा महत्त्वाचा भाग बनला आहे. मला वाटते की, मी माझ्या चाहत्यांना एक चांगले प्लॅटफॉर्म मिळवून देऊ इच्छितो. माझ्या मुलांना आणि फॅन्सला खुप आवडेल. तर त्याचा भाग होण्याची मी वाट पाहतोय. ’ सध्या हृतिक ‘मोहेंजोदारो’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.