'शोले' (Sholay) हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो. दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाची कथा आणि पात्रे आजही ५० वर्षांनंतरही लोकप्रिय आहेत. विशेषतः ज्येष्ठ दिवंगत अभिनेते अमजद खान यांनी साकारलेली डाकू गब्बर सिंगची भूमिका कोण विसरू शकेल? अमजद खान यांच्याबद्दल बोलत असताना, आम्ही तुम्हाला त्यांच्या मुलीबद्दल सांगणार आहोत, जी दिसायला खूपच सुंदर आहे. पण वडिलांच्या तुलनेत तिचे अभिनय करिअर मात्र 'महा फ्लॉप' ठरले. 'शोले'च्या गब्बर सिंगची मुलगी कोण आहे, हे जाणून घेऊया.
सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते अमजद खान यांनी १९७२ मध्ये शैला खान यांच्याशी विवाह केला. त्यांना तीन मुले झाली, ज्यात तिसऱ्या क्रमांकावर मुलगी अहलम खान हिचा जन्म झाला. अहलम खान कुटुंबातील सर्वात लहान आणि सगळ्यांची लाडकी सदस्य आहे. ती खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर आहे. अहलमबद्दल बोलायचं झाल्यास, तिनेही सिनेमात आपले नशीब आजमावण्यासाठी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. पण केवळ दोन चित्रपट केल्यानंतर तिने बॉलिवूडशी संबंध तोडला आणि पुन्हा कधीही दुसऱ्या चित्रपटात अभिनय केला नाही.
तिच्या चित्रपटांमध्ये 'मिस सुंदरी' आणि 'रिफ्लेक्शन' यांचा समावेश आहे. इतकंच नाही तर अहलम खान एक व्यावसायिक थिएटर आर्टिस्ट राहिली आहे. या नात्याने तिने 'महिंद्रा अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन थिएटर'मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे. तिचे 'आज रंग है' हे नाटक तिचे सर्वोत्कृष्ट आणि लोकप्रिय नाटक आहे. रंगभूमीच्या दुनियेत खूप नाव कमावलेल्या अहलमचे करिअर अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये मात्र अयशस्वी ठरले.
थिएटर कलाकाराशी केले लग्नअमजद खान यांच्या मुलीने प्रसिद्ध थिएटर आर्टिस्ट जफर कराचीवाला याच्याशी २०११ मध्ये लग्न केले. जफर हादेखील एक लोकप्रिय थिएटर कलाकार आहेत. मात्र, बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करण्यासाठी त्यालाही संघर्ष करावा लागला.
Web Summary : Amjad Khan's daughter, Ahlam Khan, is beautiful but her Bollywood career failed after two films. A theater artist, she won awards for her stage performances and married a fellow artist, Zafar Karachiwala.
Web Summary : अमजद खान की बेटी, अहलम खान, खूबसूरत हैं, लेकिन दो फिल्मों के बाद उनका बॉलीवुड करियर फ्लॉप हो गया। एक थिएटर कलाकार, उन्होंने अपने मंच प्रदर्शन के लिए पुरस्कार जीते और साथी कलाकार जफर कराचीवाला से शादी की।