Join us

अनुपम खेर दिसणार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 17:28 IST

ब़ॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणार आहेत. संजय बारु यांच्या 'द ...

ब़ॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणार आहेत. संजय बारु यांच्या 'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या पुस्ताकावर आधारित चित्रपट तयार करण्यात येतोयं. 'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' हे पुस्तक 2014मध्ये आले होते. या पुस्तकाचे लेखक संजय बारु हे 2004 ते 2008 मध्ये पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होते. चित्रपट पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यात 2019च्या निवडणुकींच्या आधी रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचा पहिला लूक बुधवारी आऊट होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सुनील बोहरा करणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता हंसल मेहता यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. विजय रत्नाकर गट्टे हे या चित्रपटाच्या माध्यामातून आपल्या दिग्दर्शनच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत. मनमोहन सिंग यांच्या भूमिकेसाठी अनुपम खेर यांचे नाव फायनल करण्यात आले आहे. मात्र अजून उर्वरित स्टारकास्ट फायनल होणे बाकी आहे. त्यासाठीचे ऑडिशन शेवटच्या टप्प्यात अाले असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांने सांगितले आहे.    दिग्दर्शक सांगतायेत, मी कृतज्ञ आहे मला असा चित्रपट तयार करण्याची संधी प्राप्त झाली. या चित्रपटात पीएमओ कार्यालयात चालणाऱ्या कामांवर जास्त फोकस केला जाणार आहे. 2014 मध्ये आलेल्या द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या पुस्तकाने वादळ उठवले होते. दिग्दर्शिक म्हणून आपली नवी इनिंग सुरु करणारे विजय गट्टे हे आव्हान स्वीकारण्यासाठी तयार आहेत. अनुपम खेर यांना मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत बघणे ही त्यांच्या चाहत्यांसाठी एक ट्रीट असणार आहे. त्यामुळे त्यांचे चाहते हा चित्रपट रिलीज होण्याची नक्कीच वाट पाहात असतील.