बॉलिवूड सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने अख्खा देश हळहळला. सुशांतने डिप्रेशनमुळे स्वत:ला संपवले, असे मानले जात आहेत. सुशांत अनेक दिवसांपासून डिप्रेशनशी लढत होता. त्याच्यावर उपचारही सुरु होते. मात्र एक क्षण असा आला की, डिप्रेशन हावी झाले आणि सुशांतने जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूनंतर डिप्रेशनवर अनेकजण बोलले. अशात आता गेल्या दिवसांपासून डिप्रेशनशी लढत असलेल्या एका अभिनेत्रीने पोस्ट केली आणि तिची पोस्ट पाहून सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मी जातेय, असे तिने लिहिले आणि सगळीकडे खळबळ माजली. काही मित्रांनी ही पोस्ट पाहून लगेच तिच्या घराकडे धाव घेतली. सुदैवाने ती सुरक्षित होती.ही अभिनेत्री म्हणजे कन्नड अभिनेत्री जयश्री. बिग बॉस कन्नडच्या सीझन 3 मध्ये जयश्री स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
फेसबुकवर आपण जग सोडत असल्याची पोस्ट तिने केली. ‘मी जातेय. गुडबॉय टू धीस *** वर्ल्ड अॅण्ड डिप्रेशन...’ अशी तिची पोस्ट होती. तिची पोस्ट बघून सगळ्यांनाच धक्का बसला. तिच्या काही मित्रांनी तिच्या घराकडे धाव घेतली. नशिबाने जयश्री सुरक्षित होती. यानंतर जयश्रीने जग सोडून जात असल्याची पोस्ट डिलीट केली आणि एक नवी पोस्ट टाकत आपण सुरक्षित असल्याचे सांगितले.