Join us

​असे फुटले ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ला पाय!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2017 12:44 IST

अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटाला रिलीजआधीच पाय फुटलेत, हे तुम्ही ऐकले असलेच. होय, रिलीजआधीच चित्रपट लीक ...

अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटाला रिलीजआधीच पाय फुटलेत, हे तुम्ही ऐकले असलेच. होय, रिलीजआधीच चित्रपट लीक झाला. यामुळे सर्वत्र खळबळ माजली असतानाच याबद्दलचे आणखी अपडेट्स समोर आले आहेत. शेवटी हा चित्रपट कसा लीक झाला? यामागे कुणाचा हात आहे? याचा खुलासा झाला आहे.होय, क्राईम ब्रॅन्चने या प्रकरणाचा तपास केला असता या प्रकरणामागे एका व्यक्तीचा विसरभोळेपणा कारणीभूत आहे. होय, निर्माता प्रेरणा अरोरा यांच्या बिझनेस पार्टनरच्या असिस्टंटमुळे हे सगळे प्रकरण घडले.  या अस्टिस्टंटकडे एक पेनड्राईव्ह होता. या पेनड्राईव्हमध्ये ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ची संपूर्ण स्टोरी होती. हा पेनड्राईव्ह अस्टिस्टंट कुठेतरी विसरली आणि तिथून त्याला पाय फुटले. असिस्टंट पेनड्राईव्ह विसरली आणि ते एका जिम ट्रेनरच्या हाती लागले. या ट्रेनरने हा पेनड्राईव्ह कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूजाला दिला. रेमोला आधी विश्वासच बसेना. रेमो  ऐकून आश्चर्यचकीत झाला. त्याने लगेचच तो पेन ड्राइव्ह कनेक्ट केला, तेव्हा त्याला विश्वासच बसेना. यानंतर त्याने लगेच अक्षय कुमारला याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण अक्षय  लंडनमध्ये असल्यामुळे त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर त्याने ही बाब चित्रपटाच्या निर्माता प्रेरणा अरोरा यांना सांगितली.  मग काय, रेमोकडून माहिती मिळाली अन् निर्मात्यांनी लगेचच त्या व्यक्तिविरोधात गुन्हे शाखेकडे तक्रार केली. ALSO READ : कुणी रचलायं ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ फ्लॉप करण्याचा कट?‘टॉयलेट : एक प्रेमकथा’च्या ट्रेलरला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाशी जोडलेला असल्याचे सांगण्यात येत आहे.  यात अक्षय व भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. केशव आणि जया नामक व्यक्तिरेखा ते साकारताना दिसणार आहे. केशव व जया दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघांचेही लग्न होते. पण घरात शौचालय नसल्याच्या कारणाने जया घर सोडून निघून जाते, असे याचे कथानक आहे.