Join us

बाहुबली प्रभासच्या पहिल्या बॉलिवूडपटात दिसू शकतील या पाच अभिनेत्री!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2017 19:40 IST

‘बाहुबली’ सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रभास सध्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रसिद्ध असा चेहरा बनला आहे. त्याच्या मातृभाषेव्यतिरिक्त त्याला ...

‘बाहुबली’ सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रभास सध्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रसिद्ध असा चेहरा बनला आहे. त्याच्या मातृभाषेव्यतिरिक्त त्याला देशभरातील प्रेक्षकांनी स्वीकारले आहे. याचा ढळढळीत पुरावा म्हणजे त्याच्या ‘बाहुबली-२’ने केवळ नऊच दिवसांत केलेली एकहजार कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई होय. ‘बाहुबली-२’च्या हिंदी वर्जनचा विचार केल्यास चित्रपटाने आतापर्यंत तीनशे कोटी रुपयांचा गल्ला जमविला असून, बॉलिवूडच्या तिन्ही खानच्या चित्रपटांना धोबीपछाड दिले आहे. त्याचबरोबर प्रभासची बॉलिवूड एंट्रीही निश्चित मानली जात आहे. वास्तविक प्रभासने ‘बाहुबली-२’च्या रिलीज अगोदरच स्पष्ट केले होते की, ‘बाहुबली-२’नंतर तो त्याच्या प्रॉडक्शन हाउस चित्रपटांमध्ये बिझी असणार आहे. त्याचे चित्रपट पूर्ण झाल्यानंतर जर त्याला बॉलिवूडमधून चांगली आॅफर आली तर तो नक्कीच त्याविषयी विचार करणार आहे. प्रभासच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडमधील अनेक निर्माते त्याच्याशी करारबद्ध होण्यास उत्सुक झाले आहेत. वृत्तानुसारच बॉलिवूडमधील एक मोठे दिग्दर्शक प्रभासला लवकरच लॉन्च करण्याची शक्यता आहे. अशात प्रभासची हिरोइन कोण असणार? यावरदेखील विचार सुरू असून, सध्या पाच बॉलिवूड अभिनेत्रींचे नावे समोर येत आहेत. १) कॅटरिना कैफ : अभिनेत्री कॅटरिना कैफ हिने बॉलिवूडमधील जवळपास प्रत्येक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. अ‍ॅक्शन, रोमान्स, कॉमेडी अशा प्रत्येक जॉनरमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. जर प्रभास बॉलिवूडमध्ये येत असेल तर त्याच्यासोबत कॅटरिनाची जोडी चांगली जमू शकेल. २) अनुष्का शर्मा : बॉलिवूडच्या तिन्ही खानसोबत काम करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेला चेहरा आहे. तिने ज्या स्टार्ससोबत काम केले आहे, त्या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. अशात ती प्रभाससोबत झळकल्यास हाही चित्रपट कमाल करेल यात शंका नाही. ३) सोनम कपूर : सोनम कपूर बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे, जी प्रत्येक चित्रपटात काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करीत असते. तिच्या पहिल्या चित्रपटापासून ते नीरजापर्यंत तिने नवनवे चॅलेंज अ‍ॅक्स्पेट केले आहेत. वास्तविक तिने अद्यापपर्यंत अ‍ॅक्शन भूमिका साकारली नाही. मात्र प्रभाससोबत तिची जोडी चांगली जमू शकेल. त्यामुळे निर्माते प्रभाससोबत सोनमचाही विचार करण्याची शक्यता आहे.४) दीपिका पादुकोण : बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण सध्या आघाडीची अभिनेत्री आहे. रोमान्सबरोबरच अ‍ॅक्शनमध्ये माहीर असलेल्या दीपिकाने हॉलिवूडपटातही दमदार एंट्री केली आहे. अशात ती प्रेक्षकांना प्रभाससोबत बघावयास मिळाल्यास प्रेक्षकांना ही जोडी चांगलीच भावेल यात शंका नाही. ५) प्रियंका चोपडा : बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करीत असलेल्या प्रियंकाची जोडीही प्रभाससोबत जबरदस्त असेल यात दुमत नाही. आता तुम्हीच विचार करा की, जर प्रभास अन् प्रियंका एकत्र पडद्यावर दिसल्यास काय धूम उडू शकेल. असो सध्या प्रत्येकाला प्रभासच्या बॉलिवूड एंट्रीची प्रतीक्षा लागली आहे, यात दुमत नाही.