Join us

पहिल्या मासिक पाळीचे राधिका आपटेच्या घरी जंगी सेलिब्रेशन,आईकडून मिळाले 'हे' खास गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 15:29 IST

मराठमोळी राधिका आपटे बोल्ड आणि बिनधास्त म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त आणि बेधडकपणे मांडणे,कुणाचीही ...

मराठमोळी राधिका आपटे बोल्ड आणि बिनधास्त म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त आणि बेधडकपणे मांडणे,कुणाचीही विशेषतः लोक काय विचार करतील याचा विचार न करता व्यक्त होणारी एक रोखठोक अभिनेत्री अशी राधिका आपटे हिची ओळख. वैयक्तीक असो वा व्यावसायिक कोणत्याही गोष्टीवर आपलं ठाम मत मांडताना ती जराही कचरत नाही.नुकतंच राधिकाने आपल्या खासगी आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे.राधिकाने तिच्या मासिक पाळीबाबत उघडपणे आणि जाहिररित्या भाष्य करत सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.आयुष्यातील पहिल्या मासिक पाळीच्या वेळी आईने खास पार्टी दिली होती आणि त्या दिवशी बरेच गिफ्टस मिळाल्याचेही राधिकाने सांगितले आहे.राधिकाचे आई वडिल डॉक्टर आहेत.त्यामुळे कधी ना कधी हे घडणार माहित होते असं राधिकाने स्पष्ट केले आहे. पहिल्या मासिक पाळीच्या पार्टीच्या वेळी आईने घड्याळ गिफ्ट दिल्याचेही राधिकाने सांगितले आहे. यावेळी आपली अवस्था रडकुंडीला आल्यागत झाली होती मात्र आईच्या गिफ्टसह इतर गिफ्टसुद्धा मिळाले होते असे राधिकाने म्हटले आहे. मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन या सगळ्यावर भाष्य करणारा पॅडमॅन हा सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.या सिनेमात राधिका आपटे महत्त्वाची भूमिका साकारत आहे. पद्म पुरस्कार विजेते अरुणाचलम मुरुगनाथन यांच्या जीवनावर पॅडमॅन हा सिनेमा आधारित असून खिलाडी अक्षय कुमार यांत एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे.याशिवाय अभिनेत्री सोनम कपूरचीही या सिनेमात लक्षवेधी भूमिका आहे. पॅडमॅन हा सिनेमा आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केला असून येत्या 26 जानेवारीला हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.  Also Read:अक्षय कुमारच्या पॅडमॅन या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?अक्षय कुमार पॅडमॅन हा चित्रपट घेऊन येतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरमध्ये अक्षय आपल्याला मोडकतुडके इंग्रजी बोलताना दिसत आहे. माणूस वेडा असेल तरच तो प्रगती करू शकतो असे देखील अक्षय या ट्रेलरमध्ये म्हणत आहे. पॅडमॅन या चित्रपटात अरुणाचल मधील मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष आणि स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. या ट्रेलरमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने पॅड बनवताना दिसत आहे.