इरफान खानच्या ‘दूब : नो बेड आॅफ रोजेस’चा फर्स्ट लूक रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 19:53 IST
बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा आगामी बांगलादेशी चित्रपट ‘दूब : नो बेड आॅफ रोजेस’चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. ...
इरफान खानच्या ‘दूब : नो बेड आॅफ रोजेस’चा फर्स्ट लूक रिलीज
बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा आगामी बांगलादेशी चित्रपट ‘दूब : नो बेड आॅफ रोजेस’चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. प्रसिद्ध बांगलादेशी लेखक आणि दिग्दर्शक दिवंगत हुमायूँ अहमद यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटावर बांगलादेशात बंदी घालण्यात आल्याने हा चित्रपट मागील काही दिवसांपासून चर्चेत असल्याने याबद्दलची उत्सुकता वाढली होती. अभिनेता इरफान खानने आपल्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक ट्विटरहून शेअर केला आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यावर इरफानच्या चेहºयावर गंभीर भाव दिसत आहेत. तर चेहºयाच्या खाली हिरवे डोंगर दिसत आहेत. चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिल्यावर या चित्रपटातून उत्कठ भावनांचे चित्रण करण्यात आले असेल याचा अंदाज लावता येतो. या चित्रपटाची कथा अद्याप चाहत्यांसमोर आली नसल्याने सध्याच याबद्दल अंदाज लावणे कठीन आहे. इरफान खान या चित्रपटाचे सहनिर्माता देखील आहे. बांगलादेशी दिग्दर्शक मुस्तफा सरवार फारुकी यांनी ‘दूब : नो बेड आॅफ रोजेस’चे दिग्दर्शन केले आहे. बांगला लेखक व दिग्दर्शक हुमायूँ अहमद यांच्या जीवनातील काही भागावर हा चित्रपट तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत असल्याने या चित्रपटावर बांगलादेशात बंदी घालण्यात आली आहे. असेही सांगण्यात येते की, बांग्लादेश फिल्म डेव्हलपमेंट कापोर्रेशनने (बीएफडीसी) मागील वर्षी ८ मार्च रोजी या कथेला मंजुरी दिली होती. तर यावर्षी १२ फेब्रुवारीला ‘बीएफडीसी’ने चित्रपट पाहून १५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शन करण्याचे प्रमाणपत्र दिले होते. मात्र प्रमाणपत्र दिल्याच्या एकाच दिवसानंतर बीएफडीसीने हे प्रमाणपत्र रद्द केले व चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचे सांगितले होते. आपल्या चित्रपटाबर बंदी आल्यानंतर मीडियाशी बोलताना इरफान खानने ‘बांगलादेश सरकारने चित्रपटावर बंदी घातली आहे हे माझ्यासाठी आश्यर्चकारक आहे, हा चित्रपट मानवी नात्याची कथा आहे. हा चित्रपट लोकांनी पाहिला तर लोकांचे काही नुकसान होणार आहे असे मला वाटत नाही, असे मत व्यक्त केले होते. }}}}