Join us

‘गाझी’चा फर्स्ट लुक लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 11:28 IST

‘बाहुबली’ मध्ये भल्लाल देवची लक्षवेधी भूमिका साकारणारा राणा डग्गुबती हा त्याचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘गाझी’साठी चर्चेत आहे. चाहत्यांची उत्सुकता ...

‘बाहुबली’ मध्ये भल्लाल देवची लक्षवेधी भूमिका साकारणारा राणा डग्गुबती हा त्याचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘गाझी’साठी चर्चेत आहे. चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच ‘गाझी’चा फर्स्ट लुक लाँच करण्यात आलाय. मॅटिनी एंटरटेनमेंट आणि पीव्हीपी सिनेमा निर्मित चित्रपटात नवल आॅफिसरच्या भूमिकेत राणा डग्गुबती दिसणार आहे. राणासोबत यात महत्त्वाच्या भूमिकेत तापसी पन्नू आणि के.के. मेनन हे दिसतील. चित्रपटाविषयी काही महत्त्वाच्या बाबी निर्मात्यांनी शेअर केल्या. ‘गाझी हा पहिला भारतीय चित्रपट आहे ज्याचे कथानक ‘पाण्याखालील युद्ध’ या संकल्पनेवर आधारित आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचंड वापर करून यात स्टंट्स आणि साहसी दृश्ये दाखवण्यात येणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून जगातील अनेक टेक्निशियन्स या चित्रपटावर काम करत आहेत. १७ फेबु्रवारीला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबती सध्या ‘बाहुबली २’ आणि ‘गाझी’च्या  शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मध्यंतरी, अभिनेत्री श्रिया सरनसोबत तो डेटवर गेला असताना माध्यमांच्या तावडीत अडकला होता. मात्र, त्यांच्यात काहीही नसल्याचे त्याने नंतर जाहीर केले.