Join us  

कॅटरिना कैफसोबतच्या नात्यावर दीपिका पादुकोणकडून पहिल्यांदा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 9:00 PM

दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफमधली कोल्ड वॉर सगळ्यांच माहिती आहे. यामागचे कारण होता दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर.

ठळक मुद्देदीपिका-रणबीरचे ब्रेकअप झाल्यानंतर रणबीरच्या आयुष्यात कॅटरिनाची एंट्री झाली तिथूनच दीपिका-कॅटमध्ये वादाची ठिणगी पडली होती

दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफमधली कोल्ड वॉर सगळ्यांच माहिती आहे. यामागचे कारण होता दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर. दीपिका - रणबीरचे ब्रेकअप झाल्यानंतर रणबीरच्या आयुष्यात कॅटरिनाची एंट्री झाली. तिथूनच दीपिका-कॅटमध्ये वादाची ठिणगी पडली होती. 

कॅटरिनाने दीपवीरच्या रिसेप्शनमध्ये हजेरी लावत अनेकांना धक्का दिला होता. त्यामुळे आता यादोघींमधले नातं सर्वसामान्य झालेय असे म्हणाले काहीच हरकत नाही. नुकत्याच एका इंटरव्हु दरम्यान दीपिकाने कॅटरिनासोबत असलेल्या नात्याबाबत फिल्मफेयर दिलेल्या सांगितले, ''आमच्या दोघींमध्ये असलेल्या संबंधाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. माझ्या मनात तिच्याबदल नेहमीच सम्मान आहे. ती नेहमीच मला प्रिय आहे. आमच्या दोघींमधल नातं खूपच छान आहे.''  कॅटरिनाने दीपिकाच्या रिसेप्शनमध्ये हजेरी लावल्यानंतर दोघींनी एकमेकींना इन्स्टाग्रामवर फॉलो करायला सुरुवात केली आहे.  

 सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर १४ आणि १५ नोव्हेंबरला दीपवीर लग्नबंधनात अडकले. इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दोघांनीही लग्नगाठ बांधली. यानंतर २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे दोघांच्याही लग्नाचे पहिले रिसेप्शन झाले. यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईत दुसरे रिसेप्शन रंगले. या दोन्ही रिसेप्शनमध्ये केवळ दीपिका व रणवीर यांचे जवळचे नातेवाईक व मित्र परिवार हजर होता. गत १ डिसेंबरला दीपवीरच्या लग्नाचे तिसरे रिसेप्शन झाले. हे रिसेप्शन खास बॉलीवूडमधील कलाकारांसाठी ठेवण्यात आले होते. 

टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणकतरिना कैफ