Finally : फरहान अख्तर अन् अधुना भबानीच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 21:43 IST
फायनली बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर हेअरटायलिस्ट पत्नी अधुना भबानी हिच्यापासून विभक्त झाला आहे. याबाबतची आॅफिशियल अनाउंसमेंट करण्यात ...
Finally : फरहान अख्तर अन् अधुना भबानीच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब!!
फायनली बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर हेअरटायलिस्ट पत्नी अधुना भबानी हिच्यापासून विभक्त झाला आहे. याबाबतची आॅफिशियल अनाउंसमेंट करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये या दोघांनी न्यायालयात घटस्फोटांसाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर बांद्रा कौटुंबिक न्यायालयाने सोमवारी हा अर्ज मंजूर केल्याने फरहान आणि अधुना अधिकृतपणे एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. तब्बल १६ वर्षे एकमेकांसोबत संसार थाटणाºया या जोडप्याच्या नातेसंबंधात गेल्या काही महिन्यांपासून दरार निर्माण झाली होती. ज्यामुळे या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांच्या नात्याचे वैशिष्ट्ये म्हणजे अधुना, फरहानपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे. मात्र यावरून दोघांमध्ये कधीच नाराजी नव्हती. फरहान आणि अधुना ‘दिल चाहता है’ या चित्रपटादरम्यान भेटले होते. दिग्दर्शक म्हणून फरहानचा हा पहिलाच चित्रपट होता. दोघेही तब्बल तीन वर्षे एकमेकांना डेट करीत होते. त्यादरम्यान ते दोघे नेहमीच कुठल्या ना कुठल्या इव्हेंटमध्ये बघावयास मिळत होते. तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर पुढे हे जोडपे लग्नाच्या बंधनात अडकले. या जोडप्याला शाक्या आणि अकिरा नावाच्या मुली असून, दोघेही त्यांच्या संसारात आनंदी होती. मात्र नंतरच्या काळात त्यांच्यात दरार निर्माण झाल्यानेच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, दोन्ही मुली अधुनाबरोबरच राहणार आहेत. मात्र फरहानला दोन्ही मुलींना भेटण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे आदेशात म्हटले आहे. सकारात्मक बाब म्हणजे हे दोघे घटस्फोटानंतरही चांगले मित्र म्हणून राहणार आहेत. काही दिवसांपासून फरहान नेहमीच त्याच्या मुलींसोबत स्पॉट झाला आहे. असे बोलले जात आहे की, फरहान आणि अधुनाच्या घटस्फोटामागील मुख्य कारण अभिनेत्री श्रद्धा कपूर आहे. फरहान आणि श्रद्धाची वाढती मैत्री अधुनाला अजिबात पसंत नव्हती. यावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. अखेर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. फरहानने सध्या त्याचे घर सोडून बहिणीच्या घरी सिफ्ट झाला आहे. वृत्तानुसार, फरहान लवकरच मुंबईमध्ये नवे घर घेणार आहे.