चित्रपटांनी फोडली महिला अत्याचाराला वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 04:48 IST
.मेघना गुलजार यांचा तलवार चित्रपट तर जाहीररित्या नोएडाच्या बहुचर्चित आयुषी हत्याकांडावर तयार झाला, तर संजय गुप्ता यांच्या जज्बामध्ये वकील ...
चित्रपटांनी फोडली महिला अत्याचाराला वाचा
.मेघना गुलजार यांचा तलवार चित्रपट तर जाहीररित्या नोएडाच्या बहुचर्चित आयुषी हत्याकांडावर तयार झाला, तर संजय गुप्ता यांच्या जज्बामध्ये वकील म्हणून ऐश्वर्या रॉय-बच्चन एक अशी केस लढते, ज्यामध्ये एका तरुणीचा बलात्कारानंतर खून केला जातो. बॉलिवूडचा इतिहास पाहिला तर या अतिसंवेदनशील विषयांवर भूतकाळात अनेक असे चित्रपट आले, जे या चित्रपटांचे यश बॉक्स ऑफिसवरील परिणामांच्या आधारे ठरवणे चुकीचे ठरेल. या विषयांवर तयार झालेल्या चित्रपटांमध्ये जे नाव पटकन समोर येतात ते म्हणजे, बी.आर. चोपडा यांचा चित्रपट इंसाफ का तराजू, शेखर कपूर यांचा बैंडेट क्विन, राजकुमार संतोषी यांचा दामिनी हे चित्रपट. तसे पाहता या विषयावर ५0च्या दशकापासूनच चित्रपट तयार होऊ लागले होते, मात्र बी.आर. चोपड.ा यांचा इंसाफ का तराजू पहिला असा चित्रपट होता, ज्याने या विषयाला पूर्ण ताकदिने मांडले. एक उद्योजक कशप्रकारे आपली महिला मित्र आणि नंतर तिची लहान बहीण यांच्यावर बलात्कार करतो, हे यात दाखविण्यात आले होते. शेखर कपूर यांचा बैंडेट क्विन आंतराष्ट्रीय स्तरावर चर्चित झाला जो दस्युराणी फूलन देवीच्या आयुष्यावर आधारित होता. फूलनला कशा प्रकारे जातीच्या आधारावर समाजात बलात्कारचे शिकार केले गेले, हे यात दाखविले गेले. राजकुमार संतोषी यांनी घायल नंतर दामिनी चित्रपटात घरातील काम करणार्या स्त्रीसोबत एका श्रीमंत कुटुंबातील मुलांद्वारे बलात्कार आणि घरातील सूनेद्वारे न्यायालयात साक्ष देण्याच्या विषयाला प्रेक्षकांसमोर मांडले. असे नाही की , हे तीनच चित्रपट बलात्कारावर आधारीत होते. या यादीत अनेक महत्त्वाच्या चित्रपटांचे नाव आहे, ज्यांना बॉक्स ऑफिसवर जास्त यश मिळाले नाही आणि त्यांची जास्त चर्चाही झाली नाही. मात्र त्या चित्रपटांमध्ये या विषयाला अतिशय गंभीरपणे दाखविण्यात आले होते. एरव्ही मसाला चित्रपट करणारे दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी जागोमध्ये (मनोज वाजपेयी) मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका मुलीवर होणार्या बलात्कारची घटना दाखविली होती. पंकज झा यांचा मातृभूमी की कहानी चित्रपट अशा एका महिलेवर आधारित होता, जिच्यावर लग्नानंतर पतीचा भाऊ आणि सासरे अत्याचार करताना संकोच करीत नाही आणि प्रत्येक रात्री तिच्या शरीराशी खेळतात.