या भाषांमध्ये तयार होणार रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 17:27 IST
रितेश देशमुख महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातून कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा ...
या भाषांमध्ये तयार होणार रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट
रितेश देशमुख महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातून कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट मराठी शिवाय हिंदीत सुद्धा तयार करण्यात येऊ शकतो. होय, तुम्ही बरोबर वाचलात आधी हा चित्रपट मराठीत तयार करण्यात येणार आणि त्यानंतर हिंदीत. गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा आहे की रितेश या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. सोशल मीडियावर त्यांने या गोष्टीची घोषणा देखील केली होती मात्र त्यानंतर सगळं प्रकरण एकदम थंड दिसले. मात्र पुन्हा एकदा रितेश जोशमध्ये या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. हा रितेशचा तिसरा मराठी चित्रपट असणार आहे. 2014 मध्ये आलेल्या लई भारी चित्रपटात रितेश दुहेरी भूमिकेत दिसला होता. हा त्याचा मराठीतील डेब्यू चित्रपट होता. रितेशचा हा चित्रपट आतापर्यंतचा सगळ्यात महागडा चित्रपट असणार असल्याची माहितीसुद्धा मिळते आहे. या चित्रपटाचा बजेट जवळपास 225 कोटींचा आहे. रितेश देशमुखने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर घोषणा केली होती की महाराजांच्या आयुष्यावर तायर करण्यात येणाऱ्या चित्रपटात बाहुबली पेक्षा जास्त हिरो आणि अॅक्शन बघायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपतींनी सामान्य मावळ्यांना एकत्र करुन जुलमी सत्तेच्या विरोधात उभा केलेला रोमहर्षक ऐतिहासिक रणसंग्राम मोठ्या पडद्यावर पाहायची संधी यामुळे प्रेक्षकांना मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव याचे दिग्दर्शन करणार आहेत.काही महिन्यांपूर्वी विवेक ओबेरॉयसोबत आलेल्या बँक चोर चित्रपटात रितेश झळकला होता. त्यांचा हा चित्रपट कॉमेडीवर आधारित होता. या चित्रपटात रिया चक्रवती, साहिल वैद आणि विक्रम थापासुद्धा मुख्य भूमिकेत झळकले होते. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपर फ्लॉप झाला. मात्र रितेश देशमुखने निर्मिती केलेला फास्टर फेणे चित्रपट हिट ठरला होता. त्यावेळी त्यांने दिलेल्या मुलाखतीत चित्रपट प्रेक्षकांना आवडणं हे सर्वांत जास्त महत्त्वाचं असतं. कारण एखादा चित्रपट तयार करत असताना त्यामागे खूप मोठी टीम मेहनत घेत असल्याचे तो म्हणाला होता. ALSO READ : सुजोय घोष लिहिणार रितेश देशमुखसाठी मराठी चित्रपटाची कथा