Join us  

मोदीना ‘टोमणा’ अन् सोनियांना ‘चरणस्पर्श’; रामगोपाल वर्मांचे ट्विट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 6:37 PM

Ram Gopal Varma Tweets : म्हणाले, ‘मला तुमच्या तिसरी लाट या हॉरर चित्रपटात काम द्या... मी मृतदेह मोजण्याच्या विभागातही काम करु शकतो....’

ठळक मुद्देपश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या दणदणीत विजयावरूनही त्यांनी मोदींना डिवचले आहे.

देशातील कोरोनाची भीषण स्थिती आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड दिग्दर्शक रामगोपाल वर्मा ( Ram Gopal Varma )यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांना सणसणीत टोला लगावला आहे. याऊलट काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi ) यांचे चरणस्पर्श करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.रामगोपाल यांनी एकापाठोपाठ एक अनेक उपरोधिक ट्विट केलेत. त्यांच्या या ट्विटची सध्य सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या दणदणीत विजयावरूनही त्यांनी मोदींना डिवचले आहे.

 आता काय म्हणाल सर?

सर, नरेंद्र मोदीजी, कालपर्यंत दीदी संपल्या असे तुम्ही सांगत होतात. आता काय म्हणाल सर? असा खरपूस सवाल करत रामगोपाल वर्मा यांनी मोदींना उपरोधिक टोला लगावला आहे. मला तुमचे चरणस्पर्श करायचे आहेत...

कोरोनामुळे देशात रोज हजारो बळी जात आहेत. लोक ऑक्सिजन, बेड्सअभावी प्राण सोडत आहेत. यासाठी केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार ठरवत, रामगोपाल वर्मा यांनी एक ट्विट केले आहे.‘2014 मध्ये सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना मौत का सौदागर म्हटले होते. त्यांच्याकडे इतकी दूरदृष्टी आहे, हे मला माहित नव्हते. मॅडम सोनियाजी, मी यासाठी तुमची माफी मागतो. शक्य असेल तर मला तुमच्या पायांचा फोटो पाठवा, जेणेकरून मी तुम्हाला डिजिटली चरणस्पर्श करू शकेन,’ असे ट्विट रामगोपाल वर्मा यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या जाम चर्चेत आहे.

मला तुमच्या सिनेमात काम द्या

रामगोपाल वर्मा इथेच थांबले नाहीत तर त्यांनी आणखी एक उपरोधिक ट्विट करत, मोदींवर निशाणा साधला. ऑक्सिजन व बेड्सअभावी रूग्णांच्या होत असलेल्या मृत्यूवर ताशेरे ओढताना त्यांनी एक ट्विट केले.‘तसा मी एक साधा हॉरर चित्रपट बनवणारा दिग्दर्शक आहे. पण मला तुमच्या तिसरी लाट या  हॉरर चित्रपटात स्पॉट बॉयचे तरी काम द्या, अशी विनंती मी तुम्हाला करतो.  मी अगदी कारकुनाची नोकरी करायलाही तयार आहे जो मृतदेह मोजायचे काम करेल. कारण मलाही तुमच्यासारखे मृतदेह बघायला आवडतात, अर्थात कारणं वेगवेगळी आहेत’, असे त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे.

टॅग्स :राम गोपाल वर्मानरेंद्र मोदीसोनिया गांधी