Join us  

Filmfare Awards 2024: रणबीर-आलिया जोडीला मिळाला फिल्मफेअर, '12th फेल'नेही मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 1:53 AM

यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरात येथे पार पडला.

Filmfare Awards2024:  गुजरात येथे 69th फिल्मफेअर पुरस्कार सोहळा काल पार पडला. सेलिब्रिटींनी फुल पॅक या सोहळ्यात अनेकांनी आपल्या परफॉर्मन्सने रंगत आणली. दोन दिवस चाललेल्या या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये 12th फेल सिनेमाने बाजी मारली. तर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhat) या रिअर लाईफ जोडीला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.  रणबीरला Animal मधील भूमिकेसाठी तर आलियाला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' साठी पुरस्कार मिळाला. 12th फेल हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. विक्रांत मेसीला क्रिटिक्स चॉईस सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर विधु विनोद चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. करण जोहर आणि आयुष्मान खुराना यांनी साोहळ्याचं सूत्रसंचालन करत धमाल केली.

रणबीरला

टॅग्स :फिल्मफेअर अवॉर्डगुजरातरणबीर कपूरआलिया भटविक्रांत मेसीबॉलिवूड