जॉन अब्राहमवर निर्मात्याचा फसवणुकीचा आरोप, एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 10:36 IST
‘परमाणु: द स्टोरी आॅफ पोखरण’ या चित्रपटामुळे अभिनेता जॉन अब्राहम अडचणीत आला आहे. निर्माती प्रेरणा अरोरा हिच्या क्रिअर्ज एंटरटेन्मेंट ...
जॉन अब्राहमवर निर्मात्याचा फसवणुकीचा आरोप, एफआयआर दाखल
‘परमाणु: द स्टोरी आॅफ पोखरण’ या चित्रपटामुळे अभिनेता जॉन अब्राहम अडचणीत आला आहे. निर्माती प्रेरणा अरोरा हिच्या क्रिअर्ज एंटरटेन्मेंट या प्रॉडक्शन हाऊसने जॉन विरोधात मुंबईच्या खार पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. प्रेरणा अरोराने या तक्रारीत जॉनवर फसवणुकीसह अनेक गंभीर आरोप केले आहेत. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरणी पोलिस लवकरच जॉनची चौकशी करू शकतात.‘परमाणु: द स्टोरी आॅफ पोखरण’च्या वारंवार पुढे ढकण्यात येत असलेल्या रिलीज डेटवरून जॉन व प्रेरणा अरोरा यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. आता हा वाद विकोपाला पोहोचला आहे. जॉनचे जेए एंटरटेन्मेंट आणि क्रिअर्ज एंटरटेन्मेंट मिळून हा चित्रपट प्रोड्यूस करत आहेत. आधी रिलीज डेटवरून जॉन व प्रेरणा यांच्यात मतभेद झालेत आणि पुढे हे मतभेद वाढत गेलेत. अलीकडे जॉनने प्रेरणा अरोरावर पैसे थकवल्याचा तसाच फसवणुकीचा आरोप करत क्रिअर्जसोबतचे सगळे करार रद्द केले होते. शिवाय क्रिअर्जला एक भलेमोठे कायदेशीर नोटीसही पाठवले होते. तथापि क्रिअर्जने हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. शिवाय जॉन ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला होता. जॉनने मला नेहमीच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘परमाणू’ २७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र त्याने प्रदर्शनाची तारीख २ मार्च ठेवली. यामुळे झी स्टुडिओला खूप नुकसान सहन करावे लागले. कारण जॉनने त्यांना एकही गाणे पाठविले नव्हते. आम्ही त्यांना चार कोटी रुपयांमध्ये म्युझिक विकले होते. आता आम्ही सातत्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यासाठी भांडत आहोत, असे प्रेरणा अरोराने म्हटले होते.ALSO READ : ‘परमाणु’ने आणला जॉन अब्राहमला राग! करारचं केला रद्द!!अनेकदा पुढे ढकलली रिलीज डेटसर्वप्रथम हा चित्रपट ८ डिसेंबर २०१७ रोजी रिलीज होणार होता. पण तेव्हा संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ची रिलीज डेट जवळ असल्याच्या कारणावरून ‘परमाणू’ला लांबणीवर टाकले गेले. यानंतर या चित्रपटासाठी २३ फेबु्रवारी २०१८ ही तारीख निश्चित करण्यात आली. पण राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ आणि सोनाक्षी सिन्हाचा ‘बूम बूम इन न्यूयॉर्क’ पुन्हा या चित्रपटाच्या मार्गात आला. यामुळे ‘परमाणू’ची रिलीज डेट दुसºयांदा लांबणीवर टाकण्यात आली. शेवटी ‘परमाणू’ साठी ९ एप्रिलचा मुहूर्त ठरला. पण आता ही तारीखही टळणार, अशीच चिन्हे आहेत.