fathers day special : ‘या’ पाच गाण्यांसह आजचा फादर्स डे बनवा स्पेशल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2017 13:23 IST
फादर्स डे च्या निमित्ताने आम्हीही खास आपल्यासाठी काही गाणी घेऊन आलो आहोत. होय, बाबांवरची काही खास गाणी. बॉलिवूडमध्ये आईवर अनेक गाणी आहेत. त्या तुलनेत बाबांवरची गाणी तशी फार कमी. पण जी आहेत, ती आजच्या दिवशी ऐकायलाच हवीत.
fathers day special : ‘या’ पाच गाण्यांसह आजचा फादर्स डे बनवा स्पेशल!
जन्मदाता हैं जो, नाम जिनसे मिलाथामकर जिनकी उंगली है बचपन चलाकांधे पर बैठ के, जिनके देखा जहांज्ञान जिनसे मिला, क्या बुरा, क्या भलाइतने उपकार हैं क्या कहेंये बताना न आसान है‘हम साथ साथ है’ या चित्रपटातील ‘ये तो सच है की भगवान है...’ या गाण्यातील वरील ओळी आपल्या आयुष्यातील पित्याचे स्थान अगदी नेमक्या शब्दांत मांडतात. आईच्या तुलनेते पित्याचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळे स्थान असते. आईला वात्सल्याची मूर्ती म्हटले जाते. पण वडिलांसाठी असा कुठलाही एक शब्द नाही. आईची महती सांगणारे प्रचंड साहित्य उपलब्ध आहे. पण पित्याबद्दल लिहिलेले फार क्वचित आपल्या वाचनात येते. पण म्हणून पित्याचे महत्त्व जराही कमी होत नाही. आई वात्सल्याची मूर्ती तर बाबा आपल्याला घडवणारा शिल्पकार, आई म्हणजे मऊ लोणी तर बाबा म्हणजे गरम दुधावरची साय. आज फादर्स डेच्या निमित्ताने आपला बाबा प्रत्येकाला अशाच कुठल्या ना कुठल्या रूपात आठवणार.फादर्स डे च्या निमित्ताने आम्हीही खास आपल्यासाठी काही गाणी घेऊन आलो आहोत. होय, बाबांवरची काही खास गाणी. बॉलिवूडमध्ये आईवर अनेक गाणी आहेत. त्या तुलनेत बाबांवरची गाणी तशी फार कमी. पण जी आहेत, ती आजच्या दिवशी ऐकायलाच हवीत. तेव्हा ऐका आणि आजचा आपला फादर्स डे यादगार बनवा. कयामत से कयामत तक (पापा कहते हैं बड़ा नाम करेगा) हम साथ साथ है (ये तो सच है की भगवान है) दंगल (हानिकारक बापू) मैं ऐसा ही हूं (पापा मेरे पापा) शूल ( मेरे पापा को गुस्सा जब)