Join us

फरहान-कल्की डेटवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 22:10 IST

फरहान अख्तरचा त्याची पत्नी अधुना अख्तर सोबत घटस्फोट झाल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये सुरू आहे. फरहान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘रॉक ...

फरहान अख्तरचा त्याची पत्नी अधुना अख्तर सोबत घटस्फोट झाल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये सुरू आहे. फरहान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘रॉक आॅन २’ मध्ये श्रद्धा कपूर हिच्यासोबत स्क्रिन शेअर करत आहे. तसेच ‘वझीर’ ची त्याची को-स्टार आदिती राव हैदरी हिच्यासोबतही त्याची चर्चा होत असे. जेव्हा ते दोघे एअरपोर्टवर एकत्र दिसले त्यानंतर चर्चेला तर उधाणच आले. आता म्हणे तो कल्की कोचलीनला डेटवर घेऊन जात आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ फेम कल्की सोबत तो क्लोज बाँड शेअर करत आहे. त्यांच्यातील क्लोज बाँडमुळे चर्चेला खतपाणी मिळत आहे.