Join us

फरहान अख्तरच्या एक्स पत्नीने शोधला तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असलेला बॉयफ्रेंड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 21:25 IST

बॉलिवूडमध्ये दिग्दर्शनासह अभिनयात आपली छाप सोडणारा अभिनेता फरहान अख्तर याची एक्स पत्नी अधुना अख्तर सध्या भलतीच चर्चेत आहे. त्यास ...

बॉलिवूडमध्ये दिग्दर्शनासह अभिनयात आपली छाप सोडणारा अभिनेता फरहान अख्तर याची एक्स पत्नी अधुना अख्तर सध्या भलतीच चर्चेत आहे. त्यास कारणही तसेच असून, आजकाल ती बॉलिवूडच्या एका स्टारच्या भावाला डेट करीत आहे. फरहानसोबत विभक्त झाल्यानंतर अधुना आता तिचे आयुष्य जगत असून, तिने तिच्यापेक्षा वयाने सहा वर्षांनी लहान असलेला एक बॉयफ्रेंड शोधून काढला आहे. तिचा हा बॉयफ्रेंड बॉलिवूडमधील एका स्टार अभिनेत्याचा भाऊ आहे. काही महिन्यांपूर्वीच फरहान आणि अधुना यांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला. तब्बल १६ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर हे दोघे वेगळे झाले. आता अधुना तिच्या लाइफ पार्टनरच्या शोधात असून, त्यासाठी तिने अभिनेता डिनो मोरियाचा लहान भाऊ निकोल मोरिया याची निवड केली आहे. होय, हे दोघे सध्या एकमेकांना डेट करीत आहेत. अधुना आणि निकोलला बºयाचदा एकत्र बघितले असून, दोघेही प्रेमात असल्याची चर्चा आहे. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, अधुना आणि निकोल सध्या गोवा येथे आयुष्यातील काही खास क्षण एन्जॉय करीत आहेत. याठिकाणी दोघांना समुद्राच्या किनाºयावर बघण्यात आले आहे. हातात हात घेऊन हे दोघे जगाला असे दाखवू इच्छित आहेत की, ते लवकरच लग्नाच्या बंधनात अडकतील. असे म्हटले जाते की, अधुनाचे गोवा येथे एक फार्महाउस आहे. दोघे याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून राहत आहेत. असे म्हटले जाते की, अधुना तिचे हे फार्महाउस पर्यटकांना भाडेतत्त्वावर देत असते. मात्र सध्या ती निकोलसोबत याठिकाणी राहत असल्याने पर्यटकांना या फार्महाउसपासून तिने दूरच ठेवले आहे. याठिकाणी अधुना आणि निकोल त्यांच्या मित्रांसोबत बºयाचदा पार्ट्या सेलिब्रेट करीत आहे. एका पार्टीला तर निकोलचा मोठा भाऊ डिनो मोरिया हादेखील उपस्थित होता. आता अधुनाने याठिकाणी ख्रिसमस पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी काही खास प्लॅन केले आहे.