Join us

गर्लफ्रेंड शिबानीसह फरहानला पाहून तु्म्हालाही वाटेल थंडा-थंडा कुल- कुल, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 14:58 IST

आता फरहान व शिबानीने आपल्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार, लवकरच हे कपल विवाहबंधनात अडकणार आहे.

अभिनेता फरहान अख्तर  आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. सोशल मीडियावरही या कपलचे रोमॅन्टिक फोटोंची धूम असते. सध्या दोघेही मेक्सिकोमध्ये एकत्र क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोत शिबानी बिकीनीत दिसत आहे. तसेच विविध  स्थळांना भेट देत असून तेथील संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे दोघे चर्चेत आहेत.

आता फरहान व शिबानीने आपल्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार, लवकरच हे कपल विवाहबंधनात अडकणार आहे. खुद्द फरहानने हा खुलासा केला होता.अलीकडे फरहानने त्याच्या सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता.या फोटोत शिबानी व फरहान दोघांच्याही बोटांत एकाच स्टाईलची अंगठी दिसली होती. या फोटोवरून दोघांनीही साखरपुडा केल्याचे मानले जात आहे.

फरहान घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्याने पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुलं आहेत. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासून फरहान आणि शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती. खुद्द शिबानीने फरहानसोबतचा लंडनच्या रस्त्यावरचा फोटो शेअर करत या चर्चेला तोंड फोडले होते.

 

या फोटोत फरहान पाठमोरा होता. म्हणजे त्याचा चेहरा दिसत नव्हता. पण हा फरहान आहे, हे ओळखायला लोकांना वेळ लागला नव्हता. यानंतर तर होय, तो मीच, असे खुद्द फरहाननेच जाहिर केले होते. कामाबाबत बोलायचे झाले तर फरहान ‘द स्काज इज पिंक’या चित्रपटात दिसणार असून सध्या तो या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. सोनाली बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत. 

टॅग्स :शिबानी दांडेकरफरहान अख्तर