अभिनेता फरहान अख्तर सध्या ‘डॉन 3’मुळे चर्चेत आहे. एकीकडे चाहत्यांनी ‘डॉन 3’ बनवण्याची मागणी लावून धरली आहे. दुसरीकडे फरहानने अद्याप कोणतीही स्क्रिप्ट फायनल केलेली नाही. ‘डॉन 3’सोबतच फरहान त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. पण सध्या फरहानने शेअर केलेल्या एका जुन्या फोटोबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.होय, फरहानने एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बालपणीच्या या फोटोत फरहानला ओळखणे कठीण आहे. या फोटोत फरहानसोबत त्याची बहीण जोया अख्तर शिवाय निशांत व कबीर हे चुलत भाऊ असे सगळे आहेत. ‘वाईड अँगल कॅमेरा लेन्स नव्हते त्याकाळातला हा फोटो...,’असे फरहानने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.
याशिवाय ‘तुफान’ या चित्रपटाची तयारी त्याने चालवली आहे. ‘भाग मिल्खा भाग’च्या तुफान यशानंतर फरहान अख्तर आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. फरहान या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी जोरदार तयारी करत आहे. या तयारीचे काही फोटो फरहानने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या चित्रपटात फरहान एका बॉक्सरची भूमिका साकारताना दिसणार आहे. लेखक अंजुमन राजबली यांनी ही बॉक्सरची प्रेमकथा लिहिली आहे.