Join us

फरहान अख्तर जूनमध्ये शिबानी घेऊन जाणार स्पेनला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 16:54 IST

फरहार अख्तर सध्या आपल्या प्रोफेशन लाईफपेक्षा लव्ह लाईफला घेऊन जास्त चर्चेत आहे. गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबतचे फोटो फरहान नेहमीच शेअर करत असतो. 

ठळक मुद्देअनेक वेळा फरहान सॅलेब्ससोबत फूटबॉल खेळताना स्पॉट झाला आहेफरहान ‘द स्काज इज पिंक’या सिनेमात दिसणार आहे.

फरहार अख्तर सध्या आपल्या प्रोफेशन लाईफपेक्षा लव्ह लाईफला घेऊन जास्त चर्चेत आहे. गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबतचे फोटो फरहान नेहमीच शेअर करत असतो. 

फरहान जूनमध्ये स्पेनमध्ये होणाऱ्या यूईएफए चॅम्पियन्स लीग फायनल्सला भारतातून विशेष पाहुणा म्हणून उपस्थित असणार आहे. अनेक वेळा फरहान सॅलेब्ससोबत फूटबॉल खेळताना स्पॉट झाला आहे. त्यामुळे फरहानचे फूटबॉल प्रेम सगळ्यांच माहिती आहे. यूईएफए चॅम्पियन्स लीगमध्ये रिअल माद्रीद, एफसी बार्सेिलोना, मँचेस्टर युनायटेड, बार्यन म्युनिच, पॅरिस सेंट – जर्मेन, ज्युवेंटस आदी युरोपियन क्लब्स सहभागी होणार आहेत. त्यामुळे फूटबॉल प्रेमी असलेल्या फरहानसाठी हे सामने पहाणे पर्वणीच ठरणार आहे. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर  फरहान ‘द स्काज इज पिंक’या सिनेमात दिसणार आहे.  सोनाली बोस दिग्दर्शित या सिनेमात प्रियांका चोप्रा आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत. 

फरहान आणि शिबानीने आपल्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार, लवकरच हे कपल विवाहबंधनात अडकणार आहे. खुद्द फरहानने हा खुलासा केला होता. अलीकडे फरहानने त्याच्या सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता.

या फोटोत शिबानी व फरहान दोघांच्याही बोटांत एकाच स्टाईलची अंगठी दिसली होती. या फोटोवरून दोघांनीही साखरपुडा केल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :फरहान अख्तर