Join us  

"गुन्हेगारांना लपवणाऱ्या लोकांना स्वत:ची लाज कशी वाटत नाही", हाथरस बलात्काराच्या घटनेवर फरहान अख्तर संतापला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 3:23 PM

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या बातमीने सर्वत्रच संताप व्यक्त होतोय.

रोजच्या नेहमीच्याच जीवनात, आजूबाजूला घडणा-या आगळ्या-वेगळ्या गोष्टी आपलं लक्ष वेधून घेतात. बलात्कारानंतर महिलांच्या असुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. बलात्कार, अपहरण, विनयभंग आणि हत्यांच्या घटनांमध्ये वाढ होतेय. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या बातमीने सर्वत्रच संताप व्यक्त होतोय. अभिनेता फरहान अख्तरनेही ट्वीट करत आपला राग व्यक्त केला आहे.  

 

“हाथरसमधील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून देशावर एक न पुसला जाणार डाग पडला आहे. अशा गुन्हेगारांना लपवणाऱ्या लोकांना स्वत:ची लाज वाटायला पाहिजे. पीडितेच्या कुटुंबियांना घरात कोंडून तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. घडलेला प्रकार पाहून माणूसकीचा खरंच आता अंत झाला आहे.” 

स्वरा भास्करने ट्विटमध्ये लिहिले की, 'आता वेळ आली आहे की, योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या राज्यात कायद्याच्या चिंधड्या उडवल्या जात आहे. त्यांच्या पॉलिसीजने जातीवरून भांडणे सुरू आहेत. खोटे एनकाऊंटर्स होत आहेत, गॅंगवॉर होत आहे आणि उत्तर प्रदेशमध्य बलात्काराची महामारी पसरली आहे. हाथरस केस हे केवळ एक उदाहरण आहे'.

कंगनाने ट्विट केलं होतं की, बलात्कार करणाऱ्यांना सर्वांसमोर गोळ्या झाडून मारलं पाहिजे. दरवर्षी वाढणाऱ्या या गॅंगरेपचं अखेर समाधान काय आहे? देशासाठी फार लाजेची आणि दु:खाची बाब आहे. आम्हाला दु:खं आहे की, मुलींसाठी काही करू शकलो नाहीत.

१४ सप्टेंबरला सामूहिक बलात्कार 

हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.

टॅग्स :फरहान अख्तरहाथरस सामूहिक बलात्कार