श्रद्धा कपूरवरुन झालेले भांडण विसरुन एकत्र आले फरहान अख्तर आणि आदित्य रॉय कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 13:50 IST
काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूरला घेऊन फरहान अख्तर आणि आदित्य रॉय कपूर यांच्यात झालेल्या भांडणाची मीडियात खूप चर्चा झाली होती. ...
श्रद्धा कपूरवरुन झालेले भांडण विसरुन एकत्र आले फरहान अख्तर आणि आदित्य रॉय कपूर
काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूरला घेऊन फरहान अख्तर आणि आदित्य रॉय कपूर यांच्यात झालेल्या भांडणाची मीडियात खूप चर्चा झाली होती. ज्यामुळे दोघे एकमेकांच्या समोर आले होते. श्रद्धाच्या एक्स बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूर यांच्याशी वाढत असलेल्या जवळीकीमुळे फरहान आणि श्रद्धामध्ये तणाव निर्माण झाला होता. या सगळ्या चर्चा ताज्या असताना फरहान अख्तरने आदित्य कपूरसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामुळे या सगळ्यांचर्चांवर पूर्ण विराम लागला आहे. डीएनएमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार दोघे लवकरच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. दिग्दर्शक मोहित सूरीने डीएनएला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, फरहानला त्याच्या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली आहे. याची कथा वडिल मुलांच्या नात्यावर आधारित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यात दोन एकाच वयाचे अभिनेते हवे आहेत ज्यासाठी फरहान आणि आदित्याला साईन करण्यात आले आहे. मोहितने फरहान आणि आदित्याला एकत्र साईन करण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्यलासुद्धा याचित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवण्यात आली आहे. स्क्रिप्ट ऐकल्यानंतर त्यांने चित्रपटात काम करण्यास होकर दिल्याचे समजते आहे. ALSO READ : ‘साहो’ आणि ‘सायना’च्या शूटिंगला सुरुवात करण्याअगोदर श्रद्धा कपूरने केले मोठे वक्तव्य!आशिकी 2 मध्ये आदित्य आणि मोहितने एकत्र काम केले आहे. या चित्रपटाप्रमाणेच त्यांना त्याचा आगामी चित्रपटसुद्धा हिट करायचा आहे. आदित्य आणि फरहानची चित्रपटातील स्टोरी वेगळी आहे मात्र परिस्थिती त्यांना एकत्र आणते. सूत्रांच्या माहितीनुसार आदित्य आणि फरहान यांचे नाते चांगले आहे. ते ऐकमेकांसोबत खूप चांगल्या पद्धतीने राहतात. दोघे एकत्रित काम करण्यासाठी उत्सुक आहेत. याचित्रपटाची शूटिंग पुढच्या वर्षी जानेवारीपासून सुरु करण्यात येणार आहे. याचित्रपटासाठी सध्या फरहान बॉडी बनवण्याचे काम करतो आहे.