Join us  

'तो आंब्यांचा व्हिडीओ कोणी शूट केला रे, फराह खानने फोटोग्राफर्सची घेतली शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 11:36 AM

Farah Khan Ask Photographers Who Took Viral Mango Smelling Video: व्हायरल झालेल्या व्हिडीओवर फारहचीही नजर पडली.यावरच फराहने मीडिया फ्रोटोग्राफर्सची चांगलीच शाळा घेतली.

काही दिवसापूर्वीच फराहखानचा आंबे खरेदी करतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता.या व्हिडीओत फराह फळ विक्रेत्यासोबत बार्गेनिंग करताना दिसली. इतकेच नाही तर चेह-यावरचा मास्क काढत आंब्यांचा वास घेताना दिसली. फराह या व्हिडिओत फळविक्रेत्याला चांगले आंबे दे... असे बजावताना दिसत आहेफराहला अशाप्रकारे आंबे खरेदी करताना पाहून मीडियाच्या कॅमे-याच्या नजरा तिच्यावर वळल्या आणि मीडियाच्या कॅमे-यात फराह कैद झाली.

 

सोशल मीडियावर फराहचा तो  व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. व्हिडीओ थोडा मजेशीर होता पण तरी काहींना फराहला ट्रोल केले.  हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य वक्त केले तर  नेटीझन्सने टीका करत कमेंटसचा वर्षावच केला.

फराहने टी-शर्ट आणि पँट घातली असून तिचा हा लूक खूपच छान दिसत आहे. तिने तिच्या चेहऱ्याला मास्क देखील लावला आहे. पण तिच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. ​'मास्क काढून आंब्यांचा वास कोण घेतं? कोविडचं संक्रमण होत असताना आणि तेही महाराष्ट्रात. कॉमन सेन्स विकून आंबे खरेदी केले का?' दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, 'अखेर इन्फेक्शन नाकापर्यंत पोहोचलंच' तर आणखी एका युझरनंही फराहवर टीका करताना लिहिलं, 'असंच वागायचं तर मग मास्क वापरण्याचा फायदाच काय आहे.'

व्हायरल झालेल्या व्हिडीओवर फारहचीही नजर पडली.यावरच फराहने मीडिया फ्रोटोग्राफर्सची चांगलीच शाळा घेतली. पुन्हा एकदा मीडियाच्या कॅमे-यासमोर फराह आली आणि यावेळी थेट त्यांची कानउघाडणीच करताना दिसली. फोटोग्राफर्सना तो व्हिडीओ कोणी शूट केला होता असं विचारताच सारेच हसायला लागतात. फराहने विचारलेल्या प्रश्न टाळत तिलाच विचारतात तुमचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता तुम्हाला आवडला का? त्यावर फराहलासुद्धा हसू आवरले नाही शेवटी हसत हसत बाय करत तिथून निघून गेली. फराहचाहा नवीन व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनेच आज सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे.  तिचा हा व्हिडिओ विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे

टॅग्स :फराह खान