Join us  

रानी मुखर्जीच्या हिरोजवळ उपचारासाठी नाहीत पैसे, पूजा भट्टने चाहत्यांसमोर पसरले हात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 5:12 PM

फराज खान जवळजवळ एक वर्षापासून आजाराने ग्रस्त आहे. प्रकृती चिंताजनक झाल्यावर त्याने लॉकडाऊन दरम्यान व्हिडिओ कॉलवर डॉक्टरांची ट्रिटमेंट घेतली होती. मात्र दिवसेंदिवस खालावत चाललेली  त्याची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यास सांगितले.

मेहंदी आणि फरेब सारखे सुपरहिट सिनेमा देणारा अभिनेता फराज खान गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. बेंगलुरूच्या एका रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. परिस्थीत अत्यंत चिंताजनक असल्यामुळे त्याला तातडीन रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.  ब्रेन इनफेक्शन आणि निमोनिया आजाराशी तो झुंजत आहे. त्याची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे आर्थिक मदतीची गरज आहे. फराजच्या  मदतीला पूजा भट्ट धावून आली आहे. उपचारासाठी त्याला २५ लाखांची गरज आहे. 

खुद्द पूजा भट्टने  ट्वीटमध्ये फराज खानचा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, "प्लीज जितके शक्य होईल तितके हे ट्विट शेअर करा आणि कॉन्ट्रिब्यूट करा. तुमची मी सदैव आभारी असेल. " फराजविषयी अधिक माहिती तसेच फंड ट्रान्सफर करण्याविषयी माहितीही तिने यात दिली आहे. 

"फराज जवळजवळ एक वर्षापासून आजाराने ग्रस्त आहे. प्रकृती चिंताजनक झाल्यावर त्याने लॉकडाऊन दरम्यान व्हिडिओ कॉलवर डॉक्टरांची ट्रिटमेंट घेतली होती. मात्र दिवसेंदिवस खालावत चाललेली  त्याची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यास सांगितले."फराज खानच्या उपचारासाठी जवळपास २५ लाखांची गरज होती. फंड रेजर कॅम्पेनमधून 1 लाख 8 हजार रुपये जमले आहेत.आणखी २४ लाखांची गरज असल्यामुळे जितके होईल तितके मदत करा असे आवाहन पूजा भट्ट करत आहे. 

सलमानला मिळाला करिअरचा पहिला सुपरहिट सिनेमा, आज जगतोय अज्ञातवासात

सुप्रसिद्ध अभिनेते युसूफ खान यांचा फराज खान मुलगा आहे. विशेष म्हणजे करिअरच्या सुरूवातील 'मैने प्यार किया' सिनेमासाठी सूरज बडजात्या याची सलमान नहीतर फराज पहिली चॉईस होता.  सुरज बडजात्या यांनी ‘मैंने प्यार किया’साठी अनेक नवीन चेह-यांचे ऑडिशन घेतले होते आणि यातून फराज खानची निवड करण्यात आली होती. सिनेमासाठी फराजला साइन करण्यात आले आणि सिनेमाची शूटिंगची तारीखदेखील ठरली. पण ऐनवेळी फराज खूप आजारी पडला. शूटिग करणेही त्याला शक्य नव्हते. फराज ‘प्रेम’च्या भूमिकेसाठी योग्य आहे या मतावरच सुरज ठाम होते. पण फराजची तब्येत सुधारण्याची कुठलेही चिन्हे दिसत नव्हती. अखेर सूरज बडजात्यांना दुसरा पर्याय शोधणे भाग पडले. याचदरम्यान कुणीतरी त्यांना सलीम खान यांच्या मुलाचे म्हणजेच सलमान खानचे नाव सुचवले. त्यावेळात सलमान देखील सिनेमांच्या शोधात होता. सुरज यांना सलमान ‘प्रेम’च्या भूमिकेसाठी योग्य वाटला आणि त्याची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.

टॅग्स :पूजा भटराणी मुखर्जी