Join us  

चेहऱ्यावर जखमा आणि रक्ताचे निशाण, प्रियंका चोप्राची अवस्था पाहून चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 3:30 PM

ग्लोबल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिच्या ‘सिटाडेल’ (Citadel) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

ग्लोबल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिच्या ‘सिटाडेल’ (Citadel) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. देसी गर्लने या चित्रपटात अ‍ॅक्शन करून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र प्रियांकाचा हा अवतार पाहून अनेकांना धक्का बसला. अलीकडेच प्रियांका चोप्राने 'सिटाडेल' वेब सीरिजचा BTS व्हिडिओ शेअर केला आहे. जे पाहिल्यानंतर चाहते हैराण झाले आहेत.

प्रियंका चोप्राने नुकताच इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री नादिया सिंगच्या लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सिटाडेलच्या ऑफस्क्रिन गोष्टी दाखवण्यात आले आहेत, ज्यामध्ये प्रियांका चोप्राच्या चेहऱ्यावर रक्त आणि जखमांच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना प्रियांकाने अक्षरशः रक्त, घाम आणि अश्रू. 'सिटाडेल' वरील उत्कृष्ट स्टंटसाठी don_thai, jyou10 आणि nikkipowell114 चे खूप खूप आभार, तुम्ही स्टंट इतके सोपे दिसण्यासाठी मदत केली. थांब, तू गंमत करत आहेस का! यापैकी काहीही सोपे नव्हते, परंतु तुम्ही आणि तुमच्या उत्कृष्ट टीमने मला खूप सुरक्षित वाटले. धन्यवाद!! 

तसेच माझ्या आश्चर्यकारक स्टंट डबल नीशनेशनचे विशेष आभार ज्याने माझ्यासाठी सर्व कठीण गोष्टी केल्या. तुमच्या सर्वांशिवाय हे शक्य झाले नसते. या व्हिडिओवर चाहते सतत कमेंट करत आहेत. एकाने सांगितले की प्रियांका चोप्रा एक सेल्फ मेड सुपरस्टार आहे. एक म्हणाला बाळा तू माझ्यासाठी खरोखरच तेजस्वी आणि चमकणारा तारा आहेस. सिटाडेलचा अंतिम भाग २६ मे रोजी प्रदर्शित होईल. प्रियांका चोप्रा ही लव्ह अगेनची लीड स्टार आहे. हा चित्रपट १२ मे रोजी प्रदर्शित होत आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रा