Join us  

'...म्हणून वडिलांनाच बनवलं होतं बॉयफ्रेंड', नीना गुप्तांचा खुलासा ऐकून चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 5:07 PM

नीना गुप्तां यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्या एकटेपणाबद्दल खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता बिनधास्त विधानांमुळे चर्चेत येत असतात. नुकतेच नीना गुप्ता यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींना तोंड दिले आहे. मात्र एकवेळ अशी होती जेव्हा त्यांच्या आयुष्यात सर्व काही असताना बरीच वर्षे त्यांनी एकटेपणा अनुभवला. 

नीना गुप्ता यांनी सांगितले की, 'माझ्या आयुष्यात हे अनेकदा घडले आहे कारण अनेक वर्ष माझा कोणीही पती किंवा बॉयफ्रेंड नव्हता. जेव्हा माझ्याकडे काहीच काम नव्हते तेव्हा मी एकटी पडले होते. त्यावेळी माझे वडिलच माझा बॉयफ्रेंड झाले. आता मी माझ्या भूतकाळाबद्दल फारसा विचार करत नाही.'

नीना गुप्ता आणि वेस्ट इंडीजचे क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा एकेकाळी बऱ्याच गाजल्या होत्या. नीना यांना विवियन यांच्यापासून एक मुलगी आहे. फॅशन इंडस्ट्रीत मसाबा लोकप्रिय आहे. नीना आणि विवियन यांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. पण त्यांनी सिंगल मदर बनून मसाबाचे संगोपन केले. त्यानंतर अनेक वर्षांनी त्यांनी २००८ मध्ये विवेक मेहरा यांच्याशी लग्न केले.

नीना गुप्ता यांचा 'सरदार का ग्रँडसन' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अर्जुन कपूर आणि अभिनेत्री राकुलप्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत. काशवी नायर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात में सोनी राजदान, अदिति राव हैदरी, कुमुद मिश्रा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

टॅग्स :नीना गुप्ता