Join us  

iPhone साठी चाहत्याने २० वेळा केलं अभिनेत्याला ट्विट; सोनू सूदनंही दिला मजेशीर रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 11:45 AM

सोनू सूदने चाहत्याची ही अजब मागणी पूर्ण केली नाही परंतु त्याला मजेशीर उत्तर दिले.

नवी दिल्ली – कोरोना संकट काळात लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचे हाल झाले. यावेळी अभिनेता सोनू सूद सर्वांच्या मदतीसाठी पुढे सरसावला. ट्विटरच्या माध्यमातून सोनू सूदकडे लोकांनी मदतीची याचना केली की तातडीने सोनू सूदची टीम पीडित लोकांच्या मदतीला धावून जात होती. प्रवासी मजुरापासून ते विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांसाठी सोनू सूद मदत करण्यासाठी धावला. त्याच्या या कामाचं कौतुक होत गेले.

ट्विटच्या माध्यमातून लोकांनी सोनू सूदशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. यावेळी काही असे महाभागही होते ज्यांनी मदतीच्या बहाण्याने सोनू सूदकडे वैयक्तिक अनेक मागण्या केल्या. कोणी त्यांच्याकडे गाडी मागितली तर कोणी प्ले स्टेशन. आता एका चाहत्याने सोनू सूदकडे थेट Iphone ची मागणी केली आहे. सोशल मीडियावर एकाने सोनू सूदला ट्विट करत लिहिले की, मला एक आयफोन पाहिजे. मी त्यासाठी तुम्हाला आतापर्यंत २० वेळा ट्विट केले आहे.

सोनू सूदने चाहत्याची ही अजब मागणी पूर्ण केली नाही परंतु त्याला मजेशीर उत्तर दिले. सोनूने त्याच्या ट्विटला रिप्लाय देताना सांगितले की, मलाही एक फोन हवा आहे. मी कित्येक दिवस झाले त्यासाठी वाट पाहतोय. मी यासाठी तुम्हाला २१ वेळाही ट्विट करु शकतो. या गंमतीशीर उत्तरासोबत सोनूने स्माईली इमोजीही पाठवला. सोनू सूदकडे याआधीही अनेक चाहत्यांनी अजब मागण्या केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सोनूला एका युजरने प्ले स्टेशन मागितले. तेव्हा सोनूने त्याला उत्तर दिले की, तू नशीबवाला आहेस तुझ्याकडे प्ले स्टेशन नाही, मी तुला पुस्तकं देऊ शकतो.

तर आणखी एका युजरने सोनू सूदकडे गुजरातला जाण्यासाठी गाडी मागितली होती. त्यावर सोनू सूदने त्याला उत्तर देत म्हणाला की, तुम्हाला गाडीत एसी पाहिजे की नको, त्यासोबत किती टेम्परेचर हवी असा रिप्लाय दिला होता. सोनू सूदच्या या रिप्लायला अनेकांनी लाईक्स आणि शेअर केले होते. अलीकडेच सोनू सूदने एका खेळाडूला मदत केली होती. जेव्हा अभिनेत्याला माहिती मिळाली की, त्याला चांगल्या शूज आवश्यकता आहे. तेव्हा सोनूने तातडीने त्याच्यासाठी उत्तम दर्जाची बुटे पाठवली. त्या खेळाडूने सोशल मीडियावर सोनू सूदचे आभार मानले होते.

टॅग्स :सोनू सूदकोरोना वायरस बातम्या