Join us  

मला वाटायचं आम्हीच गरीब आहोत, पण तू...! लारा दत्ता दोन वर्षापासून वापरतेय एकच मोबाईल कव्हर, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 12:17 PM

Lara Dutta चा एक फोटो व्हायरल झाला आणि यावरून लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली. कशामुळे तर जुन्या फोन कव्हरमुळे.

अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta ) सध्या ‘हिकप्स अ‍ॅण्ड हुकअप्स’ या सीरिजच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण अशात लाराचा एक फोटो व्हायरल झाला आणि यावरून लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली. कशामुळे तर जुन्या फोन कव्हरमुळे.तर त्याचं झालं असं की, रोहित भटनागरने लारा दत्तासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत लाराच्या हातात मोबाईल फोन आहे. या मोबाईलचं कव्हर पाहून अनेकांना धक्का बसला. मग काय, तिच्या या मोबाईल कव्हरचीच चर्चा रंगली. ‘ मला तर वाटायचं की आमच्या सारखे लोकचं गरीब आहेत. पण आता लारा दत्तालाच बघा, तिने तिचं फोन कव्हर दोन वर्षांपासून बदललं नाही,’ असं एका नेटक-यानं लिहिलं.

नेटक-याच्या या कमेंटकडे लाराचंही लक्ष गेलं. तिने लगेच यावर उत्तर दिलं. ‘तुम्ही बरोबर बोललात. कारण काही गोष्टींना भावनिक मूल्यही असतात,’ असं लारा म्हणाली. तिच्या या उत्तरावरून लारासाठी हे मोबाईल कव्हर किती अनमोल आहे, हे कळलं. अनेकांनी तिच्या या उत्तराचं कौतुक केलं. काही गोष्टींशी भावना जुळलेल्या असतात आणि मग त्या अनमोल ठरतात, अशा शब्दांत अनेक चाहत्यांनी तिचं समर्थन केलं.लाराच्या ‘हिकप्स अ‍ॅण्ड हुकअप्स’ या सीरिजबद्दल सांगायचं तर यात ती 40 वर्षांच्या वसुधा नामक सिंगर मदरच्या भूमिकेत आहेत. जी प्रेमाच्या शोधात आहेत. प्रतीक बब्बर यात तिच्या भावाच्या भूमिकेत आहे तर शिनोवाने तिच्या मुलीची भूमिका साकारली आहे.  26 नोव्हेंबरला लायंसगेट प्लेवर ही सीरिज रिलीज  होतेय.

टॅग्स :लारा दत्ता